विमान उड्डाणाला विलंब, प्रवाशाची थेट पायलटला मारहाण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विमान उड्डाणाला विलंब होणार असल्याची घोषणा करताच प्रवाशाने पायलटवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. दिल्ली विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. विमान सुरक्षा विभागाने या घटनेची दखल घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Passenger punches IndiGo captain making announcement of delay )
रविवारी सकाळी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर धुके पडले हाेते. इंडिगो फ्लाइटमधील पायलटने( वैमानिक) खराब हवामानामुळे विमान उड्डाणाला विलंब होईल, अशी घोषणा केली. यावेळी साहिल कटारिया या प्रवाशाने थेट पायलटवर हल्ला करत त्याच्या कानशिलात लगावली. कॅप्टनच्या शेजारी उभा असलेला फ्लाइट अटेंडंट तत्काळ त्याच्या बचावासाठी आल्याचे दिसते. तसेच साहिल कटारिया याला दुसरा प्रवासी मागे खेचताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते. याप्रकरणी प्रवासी साहिल कटारियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहे. काही युजर्संनी इंडिगो कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी अशा प्रकारे हल्ला करणार्या प्रवाशावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
A passenger hit an IndiGo captain inside the aircraft while the pilot was making an announcement.
Delhi Police says “We will take appropriate legal action against the accused”
(Screengrab of a viral video) pic.twitter.com/5YYbNGE3sI
— ANI (@ANI) January 15, 2024
हेही वाचा :
निफ्टी- सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, ‘या’ समभागांचा मोठा हातभार
Maharashtra Politics : घर अबाधित न ठेवणाऱ्यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी : मुख्यमंत्री शिंदे
Devendra Fadnavis : कारसेवक बाबरीचा ढाचा पाडत होते, तेव्हा तुम्ही निसर्गाचे फोटो काढत होता : फडणवीस
Latest Marathi News विमान उड्डाणाला विलंब, प्रवाशाची थेट पायलटला मारहाण Brought to You By : Bharat Live News Media.