तो’ करणार सायकलने ऑस्ट्रेलियाचा प्रवास!

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल, याचा सध्या नेम राहिलेला नाही. कोणी मीम्स तयार करते, कोणी काही मजेदार किस्से ऐकवते, कोणी रेल्वे स्टेशनवर तर कोणी थेट रेल्वेतच डान्स सुरू करते. मात्र, या सर्वांवर कडी करणारा एक अवलिया असाही आहे, ज्याने एक आव्हान स्वीकारत चक्क भारत ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास चक्क सायकलने … The post तो’ करणार सायकलने ऑस्ट्रेलियाचा प्रवास! appeared first on पुढारी.

तो’ करणार सायकलने ऑस्ट्रेलियाचा प्रवास!

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल, याचा सध्या नेम राहिलेला नाही. कोणी मीम्स तयार करते, कोणी काही मजेदार किस्से ऐकवते, कोणी रेल्वे स्टेशनवर तर कोणी थेट रेल्वेतच डान्स सुरू करते. मात्र, या सर्वांवर कडी करणारा एक अवलिया असाही आहे, ज्याने एक आव्हान स्वीकारत चक्क भारत ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास चक्क सायकलने करण्याचा विडा उचलला आहे. एका देशातून विमानाने दुसर्‍या देशात जायचे आणि त्यानंतर तो देश सायकलने फिरून काढायचा, असा या अवलियाचा या प्रवासातील शिरस्ता आहे.
इन्स्टाग्राम युजर जेरी चौधरी हा एक ट्रॅव्हेल ब्लॉगर आहे. त्याने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. सध्या तो भारत ते ऑस्ट्रेलिया या अनोख्या सायकल प्रवासात आहे. त्याने स्वत:च हे आव्हान निश्चित केले असून, आता त्याचा प्रवास कसा असेल, याविषयी उत्सुकता साहजिकच असणार आहे.
सध्या हा अवलिया व्हिएतनाममध्ये असून, भारत व व्हिएतनामच्या चलनात कसा फरक आहे, यावर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. गत आठवड्यात त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला असून, आतापर्यंत त्याला 86 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्या व्हिडीओत तो कंबोडियातून व्हिएतनाममध्ये प्रवेश करताना दिसून आला.
आता त्याने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर नेटिझन्सनी यावर अनेक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तो सायकलने समुद्र कसा पार करत असेल, अशी शंका उपस्थित केली, तर काहींनी तो अशा किती दिवसांच्या प्रवासानंतर तो ऑस्ट्रेलियात पोहोचू शकणार, असा सवाल केला. एका युजरला मात्र एका देशातून विमानाने दुसर्‍या देशात जायचे आणि त्यानंतर तो देश सायकलने फिरून काढायचा, यात काहीच हशील वाटत नाही. जेरी पैशाबरोबरच वेळ व ऊर्जाही विनाकारण वाया घालत असल्याची टीका या युजरने केली.
Latest Marathi News तो’ करणार सायकलने ऑस्ट्रेलियाचा प्रवास! Brought to You By : Bharat Live News Media.