ग्रीनलँडमध्ये सापडले अज्ञात जीवाश्म

नूक-ग्रीनलँड : ग्रीनलँड देशातील एका पाणथळ ठिकाणी अज्ञात जीवाचे जीवाश्म आढळून आले असून, यामुळेही संशोधकही बुचकळ्यात पडले आहेत. हे जीवाश्म अतिशय पुरातन काळातील असावेत, इतकाच अंदाज सध्या व्यक्त करण्यात आला आहे. हा जीव धोकादायक राहिला असेल, असा होराही व्यक्त केला गेला. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही. या जीवाश्माच्या पचन संस्था प्रणालीत आयसो … The post ग्रीनलँडमध्ये सापडले अज्ञात जीवाश्म appeared first on पुढारी.

ग्रीनलँडमध्ये सापडले अज्ञात जीवाश्म

नूक-ग्रीनलँड : ग्रीनलँड देशातील एका पाणथळ ठिकाणी अज्ञात जीवाचे जीवाश्म आढळून आले असून, यामुळेही संशोधकही बुचकळ्यात पडले आहेत. हे जीवाश्म अतिशय पुरातन काळातील असावेत, इतकाच अंदाज सध्या व्यक्त करण्यात आला आहे. हा जीव धोकादायक राहिला असेल, असा होराही व्यक्त केला गेला. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही.
या जीवाश्माच्या पचन संस्था प्रणालीत आयसो एक्सिस नावाच्या एका ऑर्थोपॉडचे अवशेष सापडले असून, यामुळे याचे औत्सुक्य वाढले आहे. याच आधारावर शास्त्रज्ञांनी याचे नाव ‘टिमोरेबेस्टिया’ असे निश्चित केले आहे. टिमोरेबेस्टिया हा लॅटिन शब्द असून, ‘अतिरेकी जीव’ असा या शब्दाचा अर्थ आहे.
शास्त्रज्ञांनी सध्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हा जीव थोडाथोडका नव्हे, तर चक्क 50 कोटी वर्षांहून जुना असण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या जीवाची लांबी 30 सेंटिमीटर्सपेक्षा अधिक असू शकेल, असा त्यांचा होरा आहे. या जीवाच्या अंगावर पंख, लांब तुर्‍यासह मोेठे डोकेही होते, असा दावा केला गेला आहे. या अजब जीवाच्या तोंडात भयंकर जबड्याची संरचनाही आढळून आली आहे. सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये यावर शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
Latest Marathi News ग्रीनलँडमध्ये सापडले अज्ञात जीवाश्म Brought to You By : Bharat Live News Media.