धक्कादायक ! विस्तार अधिकार्याकडून शिक्षिकेवर बलात्कार
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ग्रामीण भागातील एका शिक्षिकेवर गोपनीय शेरेे खराब करून अडचणीत आणून नोकरी गमावण्यास भाग पाडेन, असा दबाव टाकत विस्तार अधिकार्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी आत्महत्या करण्याची धमकीदेखील या विस्तार अधिकार्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात सचिन हरिभाऊ लोखंडे (वय 47, रा. वारजे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 35 वर्षीय शिक्षिकेने तक्रार दिली आहे. हा प्रकार गेल्या सात वर्षांपासून सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार पीडिता शाळेत शिक्षिका आहेत. तर जिल्हा परिषदेत सचिन लोखंडे हा विस्तार अधिकारी आहे. दरम्यान, सचिन व पीडितेची 2016 पासून ओळख आहे. या ओळखीनंतर अधिकारी पदाचा गैरवापर करून त्यांना नोकरी घालवण्याची तसेच गोपनीय शेरे खराब करून अडचणीत आणेल, असा दबाव टाकत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.
हेही वाचा
गरीब विद्यार्थ्यांवर संक्रांत; स्वयं-अर्थसहाय्यित खासगी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती बंद
ऊसतोडणी महामंडळाकडे 78 कोटी जमा, तरीही काम पुढे सरकेना
बाजार समितीच्या तपासणीत दिरंगाईच; पणन संचालकांचे आदेश धुळखात
Latest Marathi News धक्कादायक ! विस्तार अधिकार्याकडून शिक्षिकेवर बलात्कार Brought to You By : Bharat Live News Media.