जालना : आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट
जालना ; Bharat Live News Media ऑनलाईन आमदार बच्चू कडू यांनी आज अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी जरांगे यांना एक कागदाची प्रत दिल्याचे समोर येत आहे. या आधीही बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविला होता. मात्र जरांगे यांचे मुंबईत २० जानेवारीला आंदोलन होणार आहे. त्या आधी आमदार बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. दरम्यान २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणारच अशी भूमीका जरांगे यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी जरांगे यांनी केली असून, मराठे रस्त्यावर उतरल्यावर अधिवेशन बोलवून काय उपयोग असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
हेही वाचा :
Ayodhya Ram Mandir : ५५ देशांच्या १०० नेत्यांना अयोध्येचे निमंत्रण
Latest Marathi News जालना : आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.