लोकसभेसाठीच राममंदिराचा मुद्दा : पृथ्वीराज चव्हाण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे प्रभू रामाला निवडणुकीचा मुद्दा बनवला जात आहे. राम मंदिराचे काम अपूर्ण असतानाही प्राणप्रतिष्ठेची घाई केली जात आहे. धर्मगुरुंनाही त्याचे आमंत्रण नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही सुरु असल्याची टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. येथील काँग्रेस भवनात माध्यमांशी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, … The post लोकसभेसाठीच राममंदिराचा मुद्दा : पृथ्वीराज चव्हाण appeared first on पुढारी.

लोकसभेसाठीच राममंदिराचा मुद्दा : पृथ्वीराज चव्हाण

सातारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे प्रभू रामाला निवडणुकीचा मुद्दा बनवला जात आहे. राम मंदिराचे काम अपूर्ण असतानाही प्राणप्रतिष्ठेची घाई केली जात आहे. धर्मगुरुंनाही त्याचे आमंत्रण नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही सुरु असल्याची टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
येथील काँग्रेस भवनात माध्यमांशी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई केली आहे. शंकराचार्यांना तसेच धर्मगुरुंना बोलावलं नाही. हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय कार्यक्रम? मोदी कोणत्या अधिकाराने तेथे भूमिपूजन व प्राणप्रतिष्ठा करत आहेत. अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. चीनने आक्रमण करुन भारतीय भूमीवर छावण्या उभारल्या, 20 भारतीय जवान शहीद झाले, त्याबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही फेल गेला. आता कोणताच मुद्दा नसल्यामुळे त्यांनी प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा काढला असल्याचे आ. चव्हाण म्हणाले.
Latest Marathi News लोकसभेसाठीच राममंदिराचा मुद्दा : पृथ्वीराज चव्हाण Brought to You By : Bharat Live News Media.