रेती तस्करांचा एसडीओवर हल्ला, आरोपींना अटक, ट्रक, कारही जप्त
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या काही दिवसात जिल्हा। प्रशासनामार्फत रेती माफियांचा फास आवळला जाताच रविवारी (दि. १४) उपविभागीय दंडाधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्यावर रेती माफियांनी गाडी रोखून जीवघेणा हल्ला केला. आज या प्रकरणाचे पडसाद राजकिय वर्तुळात पहायला मिळाले. रात्री उशिरा या प्रकरणी पोलीस स्टेशन रामटेक येथे आरोपी विरुद्ध 307,353 अन्वये गुन्हा नोंद करून यातील ट्रक क्रमांक 40 एक 4158 चालक आरोपी नामे1) जोगेश्वर हरिदास यादव 35 वर्ष रा. पारडी नागपूर व यातील नॅनो कार चालक 2) मोनू कादर खान वय 34 वर्ष रा. खरबी नागपूर 3) विष्णू चंद्रप्रकाश मिश्रा वय 33 वर्ष रा. खरबी नागपूर यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यामध्ये वापरल्या गेलेला ट्रक व कार जप्त करण्यात आले. ही कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे,रामटेक पोलीस निरीक्षक हृदयनाथ यादव यांनी व त्यांच्या चमूने पार पाडली.
Latest Marathi News रेती तस्करांचा एसडीओवर हल्ला, आरोपींना अटक, ट्रक, कारही जप्त Brought to You By : Bharat Live News Media.