१४ गावच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट

नेवाळी (ठाणे); पुढारी वृत्तसेवा : ठाणे मनपाच्या भंडार्ली डम्पिंग ग्राऊंडला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात रात्रींचग्य वेळी प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिक हैराण झाले आहेत. मात्र या पसरलेल्या धुरामुळे नागरिकांनी ठाणे मनपा विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बंद केलेल्या डम्पिंग वरील कचरा उचलण्याचे आश्वासन आयुक्त डॉ.अभिजित … The post १४ गावच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट appeared first on पुढारी.

१४ गावच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट

नेवाळी (ठाणे); Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाणे मनपाच्या भंडार्ली डम्पिंग ग्राऊंडला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात रात्रींचग्य वेळी प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिक हैराण झाले आहेत. मात्र या पसरलेल्या धुरामुळे नागरिकांनी ठाणे मनपा विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बंद केलेल्या डम्पिंग वरील कचरा उचलण्याचे आश्वासन आयुक्त डॉ.अभिजित बांगर यांनी दिले असताना त्याचे पालन न केल्यास सध्या १४ गावांचा श्वास या डम्पिंग ग्राउंडवरील धुराने कोंडला आहे.
भंडार्ली गावच्या डोंगरावर ठाणे मनपाने घन कचरा प्रकल्पाच्या नावाने डम्पिंग ग्राऊंड सुरु केलं होत. या डोंगरावर कचऱ्याचे भले मोठे ढिगारे हे तयार झाले होते. या ढिगाऱ्यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि शेतरकऱ्यांच्या शेतीचे देखील नुकसान झाले होते. १४ गावातील जनतेने विरोध केल्या नंतर २५  ऑक्टोबर २०२३ पासून हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे. मात्र डोंगरावर असलेला कचरा उचलला गेला नसल्याने रविवारी रात्री या कचऱ्याने पेट घेतला आहे. या डम्पिंग वरील कचऱ्यात प्लास्टिकचा प्रमाण अधिक असल्याने आगीचे प्रमाण देखील तीव्र आहे. सध्या ग्रामस्थांकडून ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाला प्रचारात करण्यात आली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र परिसरात पसरलेल्या धुराने नागरिक मात्र प्रचंड हैराण झाले आहेत.
Latest Marathi News १४ गावच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट Brought to You By : Bharat Live News Media.