नाव कोकणरेल्वे प्रवाशांना सोयी सुविधा मात्र परराज्यात ; सिधुदुर्गात लक्षवेधी प्रवासी संघटना एकवटल्या
ओरोस; Bharat Live News Media वृत्तसेवा : १४-कोकण रेल्वेच्या प्रश्नासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी संघटना एकवटल्या असून सावंतवाडीत हक्काचे टर्मिनल सिंधुदुर्ग स्टेशनवर एल टी टी , नागपूर ,पुणे ,जनशताब्दी, नेत्रावतीसह जलद गाड्या थांबा तसेच स्वतंत्र तिकीट कोटा ,मार्केट यार्ड साठी रो रो प्लॅटफॉर्म, स्वतंत्र बोगी रेल्वे विभागीय उप कार्यालय यासह विविध मागण्यांसह रेल्वेच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटना कार्यरत राहणार असून प्रवाशांच्या समस्येसाठी एकवटली आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग या नावाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशीतील प्रवासी संघटना स्थापन करण्यासाठी एक समन्वय समिती बैठक रानबांबुळी ग्रा प येथे नंदन वेंगुर्लेकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, कसाल सरपंच राजन परब, सागर तळवडेकर, उपसरपच सुभाष बांबुळकर, साईआंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली, यावेळी या परिसरातील प्रमुख पदाधिकारी रेल्वे प्रेमी प्रवासी उपस्थित होते .
कोकण रेल्वे ही कोकण वासियांसाठी महत्त्वाची रेल्वे असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्गसह स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा, तिकीट कोटा, सोयी सुविधा यासह प्रश्नांसाठी लक्षवेधी संघटना निर्माण करण्यासाठी या बैठकीत सादर चर्चा झाली. कोकण रेल्वेच्या या मार्गावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर कोकणकन्या, मांडवी, दादर सावंतवाडी, दिवा पॅसेंजर आदी गाड्यांना थांबा आहे तर काही ठराविक दिवशी येणाऱ्या एक दोन गाड्या ना थांबा मिळतो सिंधुदुर्ग या स्टेशनवर एलटीटी मडगांव, नागपूर मडगाव, पुणे यासह जनशताब्दी, नेत्रावती सारख्या गाड्यांना थांबा मिळावा. येथील जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या या रेल्वे स्टेशनवर प्रवासी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जलद गाड्यांना थांबा मिळावा सावंतवाडी येथे गेले अनेक वर्षे सुरू असलेले टर्मिनल चे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे सावंतवाडी टर्मिनल वरून काही गाड्या सुटू शकतात त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या दहा स्टेशनवर होऊ शकतो सावंतवाडी दादर शिवाजी टर्मिनल स्वतंत्र गाडी सोडावी , पी आर एस तिकीट कोठा सिस्टीम सुरू करावी , कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा फोटो स्टेशनवर लावावा येथील निवारा शेड संख्या वाढवावी तसेच पलीकडच्या पश्चीम बाजूने रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र रस्ता व्हावा, महिला आणि पुरुषांसाठी सुलभ सौचालय सुविधा संख्या वाढवावी दिवा पॅसेंजर प्रमाणे रात्रीच्या वेळी मडूरा सावंतवाडी दादरनवीन गाडी सुरू करावी , रेल्वे स्टेशन साठी रानबांबुळी गावाचे नाव असावे , सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १५ रेल्वे गाड्या मडगाव , केरळ व अन्य ठिकाणी थांबतात सिंधुदुर्गात एकही थांबा नाही तर १० गाड्यांना एक दुसरा ठराविक थांबा सिंधुदुर्गात आहेकोकणवासीयांसाठी रेल्वे आणि फायदा मात्र पर राज्यांसाठी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी संघटना स्थापन होऊ लागल्या असून सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन परिसरातील ही प्रवासी संघटना कार्यरत होत आहे येत्या दोन दिवसात याबाबत संघटना कार्यरत बैठक होऊन याबाबतचे निवेदन देण्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत झाला कोकण रेल्वे वैभववाडी , कणकवली , कुडाळ , सावंतवाडी या चार तालुक्यातून जाते उर्वरित तालुक्यातूनही रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना सामावून घेण्याचे ही या बैठकीत ठरले
कोकण रेल्वे या नावाने रेल्वे सुरू आहे परंतु सिंधुदुर्ग आणि कोकणातील या अन्य जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्यांकडे कोकण रेल्वे दुर्लक्ष करत आहे ज्या गोवा , केरळ , कर्नाटक व अन्य भागातील रेल्वे प्रवाशांना सोयी सुविधा मिळतातरेल्वेच्या अनेक सोयी सुविधांचा योजनांचा फायदा घेतात त्याप्रमाणे सिंधुदुर्गातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीस अधिक वाढत चालले आहेत यावर लक्ष देण्यासाठी ही प्रवासी संघटना अधिक प्रकर्षाने काम करणार असल्याचे यावेळी नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले तर सावंतवाडी टर्मिनल प्रवासी संघटनेचे सागर तळवडेकर यांनी कोकण रेल्वेच्या अनेक समस्या वर लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची संघटना संघटित होणे आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १५ रेल्वे थांबतच नाहीत यास प्रश्नांवर लक्ष वेधला त्यामुळे आपण संघटित होऊ या उद्याच्या या होणाऱ्या बैठकीत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
Latest Marathi News नाव कोकणरेल्वे प्रवाशांना सोयी सुविधा मात्र परराज्यात ; सिधुदुर्गात लक्षवेधी प्रवासी संघटना एकवटल्या Brought to You By : Bharat Live News Media.