जळगाव : मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून, चार संशयितांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव येथे क्रिकेट स्पर्धेच्या वादातून काही तरुणांनी धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चाळीसगाव येथील राहणारा शुभम अर्जून आंगणे (वय 28) हा मुलगा मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता. चाळीसगावला शहरात क्रीकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात … The post जळगाव : मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून, चार संशयितांना अटक appeared first on पुढारी.

जळगाव : मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून, चार संशयितांना अटक

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव येथे क्रिकेट स्पर्धेच्या वादातून काही तरुणांनी धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
चाळीसगाव येथील राहणारा शुभम अर्जून आंगणे (वय 28) हा मुलगा मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता. चाळीसगावला शहरात क्रीकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरीकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी मयत घोषीत केले. ही वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. चाळीसगाव शहरा खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Latest Marathi News जळगाव : मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून, चार संशयितांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.