कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी; जरांगे पाटील यांची मागणी

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जालन्यात २०० गावठी पिस्तूल घेण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांकडून रसद पुरवले जात असल्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल म्हटलं होते. यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ हे पागल झाले आहेत, त्यांना डोकं राहिलेलं नाही. ते कामातून गेले आहेत. गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी छगन भुजबळाचे … The post कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी; जरांगे पाटील यांची मागणी appeared first on पुढारी.

कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी; जरांगे पाटील यांची मागणी

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : जालन्यात २०० गावठी पिस्तूल घेण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांकडून रसद पुरवले जात असल्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल म्हटलं होते. यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ हे पागल झाले आहेत, त्यांना डोकं राहिलेलं नाही. ते कामातून गेले आहेत. गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी छगन भुजबळाचे सर्व कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.
पिस्तूल मुद्यावरून पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, पिस्तूल आले एकाट्यांना कसे माहिती. तुम्ही तुमच्या लोकांना हे पिस्तूल देऊन आमच्या आंदोलनात सहभागी करून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करता का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तुम्ही आमच्या शांततेच्या आंदोलनाची बदनामी करून वातावरण बिघडवण्याचे कट कारस्थान रचत नाहीत ना? असा आरोप करत भुजबळ यांची चौकशी करण्याचे आवाहन ही जरांगे पाटील यांनी केले.
 भुजबळ हे आता बधीर झाले आहेत, त्यांना दुसरे काही काम राहिले नाही. त्यांना तेवढच काम राहिले आहे. भुजबळ हे मंत्रिमंडळाला आणि राज्याला लागलेला कलंक असून ते पागल झाले आहेत, अशी खोचक टीकाही पाटील यांनी केल्या.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळू देणार नाही असे भुजबळ म्हणतात. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ५४ लाख मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतले. मराठा ओबीसी आरक्षणामध्ये गेला आहे.
Latest Marathi News कायदेशीर पदाचा राजीनामा घेऊन भुजबळांची चौकशी करावी; जरांगे पाटील यांची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.