भारताने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून लष्‍कर मागे घ्‍यावे : अध्‍यक्ष मुईझ्झू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत सरकारने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून आपले लष्कर मागे घ्‍यावे, असे अध्‍यक्ष मोहम्‍मद मुईझ्झू यांनी म्‍हटले आहे. मालदीव सरकारच्या विनंतीवरून मागील अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये भारताचे लष्कर तैनात आहे. सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारणासाठी मदत करणे हा येथे तैनात असणार्‍या भारतीय लष्‍कराचा मुख्‍य उद्देश आहे. ( Maldives asks India to withdraw its military … The post भारताने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून लष्‍कर मागे घ्‍यावे : अध्‍यक्ष मुईझ्झू appeared first on पुढारी.

भारताने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून लष्‍कर मागे घ्‍यावे : अध्‍यक्ष मुईझ्झू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारत सरकारने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून आपले लष्कर मागे घ्‍यावे, असे अध्‍यक्ष मोहम्‍मद मुईझ्झू यांनी म्‍हटले आहे. मालदीव सरकारच्या विनंतीवरून मागील अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये भारताचे लष्कर तैनात आहे. सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारणासाठी मदत करणे हा येथे तैनात असणार्‍या भारतीय लष्‍कराचा मुख्‍य उद्देश आहे. ( Maldives asks India to withdraw its military presence )
मालदीवच्‍या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या लक्षव्‍दीप दौर्‍यावर केलेल्‍या आक्षेपार्ह टीकेनंतर भारत आणि मालदीवमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. अशातच चीनचा दौर्‍यावरुन परतल्यानंतर मुईझ्झू यांनी “भारताने धमकी देवू नये,” अशी भाषा सुरु केली. आता लष्‍कर मागे घेण्‍याची मागणी त्‍यांनी केली आहे. ( Maldives asks India to withdraw its military presence )
चीन दौर्‍याची सांगता झाल्‍यानंतर शनिवारी( दि.१३) माध्‍यमांशी बोलताना मालदीवचे अध्‍यक्ष मुईइ्‍झू भारतावर अप्रत्‍यक्ष टीका करताना म्‍हणाले की, कोणत्‍याही देशाला आम्‍हाला धमकवण्‍याचा अधिकार नाही. आम्ही लहान असू शकतो; परंतु हा तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना देत नाही,”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबद्दल मालदीवच्या काही राजकीय नेत्यांनी मंत्र्यांसह अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मालदीवच्‍या मंत्र्यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याचा अंदाज भारतीय पर्यटकांना मालदीवपासून लांब राहण्‍यचा सल्‍ला मानला. भारताने मालदीवकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ७ जानेवारी रोजी तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. यानंतर मालदीवच्या भारतातील राजदूतांना समन्‍स बजावण्‍यात आले. त्‍यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडिया पोस्टबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. ( Maldives asks India to withdraw its military presence )
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर केलेल्‍या आक्षेपार्ह टीकेमुळे भारतीय संतप्त झाले. मालदीवमध्‍ये साजरी करण्‍यात येणार्‍या नियोजित सुट्ट्या रद्द केल्या यानंतर चीनमध्ये राज्य दौऱ्यावर असलेले मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी आमच्‍या देशात अधिक पर्यटकांना पाठवा, अशी याचनाच चीनला केली आहे.
हेही वाचा : 

आंतरराष्‍ट्रीय : मालदीवचा आत्मघात भारताचा इशारा
India-Maldives row | मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांना यायचे होते भारत भेटीवर, पण…
चीन दौर्‍यानंतर मालदीवच्‍या अध्‍यक्षांची ‘भाषा’ बदलली; म्‍हणे, “आम्‍हाला धमकवण्‍याचा…”

 
 
 
Latest Marathi News भारताने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून लष्‍कर मागे घ्‍यावे : अध्‍यक्ष मुईझ्झू Brought to You By : Bharat Live News Media.