अमरावती : महायुतीच्या मेळाव्याला बच्चू कडू यांची पाठ; चर्चेला उधाण

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली. मात्र, शहरात असूनही प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली, यामुळे चर्चेला उधाण आले आहे. गेले काही दिवस बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात अमरावती मतदारसंघावरून कलगीतुरा सुरू आहे. Bachchu Kadu महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी … The post अमरावती : महायुतीच्या मेळाव्याला बच्चू कडू यांची पाठ; चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

अमरावती : महायुतीच्या मेळाव्याला बच्चू कडू यांची पाठ; चर्चेला उधाण

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली. मात्र, शहरात असूनही प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली, यामुळे चर्चेला उधाण आले आहे. गेले काही दिवस बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात अमरावती मतदारसंघावरून कलगीतुरा सुरू आहे. Bachchu Kadu
महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष, प्रा. जोगेंद्र कवाडे यासह घटक पक्षातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा उमेदवार कोण? याविषयी कार्यकर्ते व नेते आपले मत मांडणार असल्याने राजकिय वर्तुळात उत्सुकता होती. मेळाव्याला युवा स्वाभिमानकडून आमदार रवी राणा, भाजपकडून आमदार प्रवीण पोटे, शिंदे गट माजी आमदार अभिजित अडसूळ, राष्ट्रवादी अजित पवार गट संजय खोडके, प्रहारतर्फे पवन वसू यांचेसह १५ पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. Bachchu Kadu
हेही वाचा 

Amravati Accident : अमरावती महामार्गावर तिहेरी अपघात; पती-पत्नी ठार, मुलगी जखमी
अमरावती : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अमरावती लोकसभा निवडणूक लढणार : आनंदराज आंबेडकर
नागपूर : हिट अँड रन कायद्यांतर्गत नियमांविरोधात अमरावती, जबलपूर महामार्ग रोखले

Latest Marathi News अमरावती : महायुतीच्या मेळाव्याला बच्चू कडू यांची पाठ; चर्चेला उधाण Brought to You By : Bharat Live News Media.