महत्वाची बातमी : दुपारची लोकल सोमवारपासून धावणार

पिंपरी : लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारची बंद केलेली लोकल आता पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार (दि.15) पासून या लोकल धावणार असल्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे. कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल चालवल्या जात होत्या.
परंतु आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या तरी देखील या लोकल अद्यापपर्यंत बंद आहेत. या दुपारच्या वेळेतील रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी संसदेत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने केल्याने खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
दुपारच्या लोकल
– शिवाजीनगर स्थानकावरून 12 वा. 5 मी. लोकल सुटणार. ती 12 वा. 45 मी. लोणावळा स्थानकात पोहोचणार.
– लोणावळा स्थानकावरून सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी लोकल सुटेल. ती शिवाजीनगर येथे 1 वाजून 20 मिनिटांनी दाखल होईल.
हेही वाचा
Pimpri News : महापालिका उभारणार इको फ्रेंडली सिटी सेंटर
फुकटचे नारळ फोडण्याची हौस भागेना : आ. प्राजक्त तनपुरे
Nagar : पाथर्डीत 210 शिक्षकांच्या विमा पॉलिसी बंद
Latest Marathi News महत्वाची बातमी : दुपारची लोकल सोमवारपासून धावणार Brought to You By : Bharat Live News Media.
