
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचा ३ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. यानंतर आता नुकतेच मुंबईत निता अंबानी याच्या कल्चरल सेंटरवर इराच्या लग्नानंतरच्या खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं आहे. या पार्टीला राजकिय नेत्यासोबत अनेक बॉलिवूड आणि मराठी स्टार्सनी दिमाखात हजेरी लावली आहे. मात्र आमिर खानची पत्नी आणि इराची सावत्र आई किरण रावने या पार्टीत हजेरी लावली नाही. याचे कारण आता समोर आलं आहे. ( Ira Khan Reception )
संबंधित बातम्या
Ira Khan-Nupur Wedding Reception : आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला दिग्गजांसह बॉलिवूड स्टारची हजेरी (video)
Captain Miller collection : ‘कॅप्टन मिलर’ ची दोन दिवसांत जबरदस्त कमाई; धनुषची चार चित्रपटांना टक्कर
Ira Khan Wedding : इरा नुपूर शिखरेसोबत विवाहबद्ध, आमिरच्या दोन्ही एक्स पत्नीही
मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन, माधुरी दिक्षित नेने, कार्तिक आर्यन, सलमान खान, अमृता फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कॅटरिना कैफ, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, शेहनाज गिल, रणबीर कपूर, अलिजेह अग्निहोत्री, रितेश देशमुख, आदित्य ठाकरे, कंगना रामावत, हिमेश रेशमिया, आयुष्यमान खुराणा आणि जुही चावला यासारख्या अनेक दिग्गज स्टार्सनी हजेरी लावली होती. मात्र, याच दरम्यान आमिर खानची पत्नी आणि इराची सावत्र आई किरण रावने या पार्टीत दिसली नाही. यामुळे नेटकऱ्यांनी तिने पार्टीवर बहिष्कार टाकल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. आता तिने या पार्टीला का हजेरी लावली याचे कारण आमिरने सांगितले आहे.
बॉलिवूड आभिनेता आमिर खानचा नुकताच एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमिर खान ब्लॅक- व्हाईट रंगाच्या शेरवानीत खूपच क्यूट दिसत होता. यावेळी त्याने स्वत: या पार्टीला किरण राव का आली नाही? याचा खुलासा केला आहे. यासोबत त्याने एका चित्रपटाच्या टिमसोबत पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला हटके पोझ दिली आहे. यावेळी त्याने किरण राव आजारी असल्याने या पार्टीला हजेरी लावू शकली नसल्याचे म्हटलं आहे.
यावरून किरण रावची तब्येत बिघडल्याने ती पार्टीला पोहोचली नसल्याचे समोर आली आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावरील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे या सोहळ्यात इराने भरगच्च डिझाईन केलेला रेड- गुलांबी रंगाचा लेंहगा परिधान केलाय. तर नुपूर ब्लॅक करलच्या सेरवानीत एकदम हँडसम दिसला. या सोहळ्याच अनेक फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. ( Ira Khan Reception )
(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
Latest Marathi News आमिरची पत्नी ‘या’ कारणाने आली नाही लेकीच्या रिसेप्शनला Brought to You By : Bharat Live News Media.
