अयोध्येत रामभक्तांसाठी पिंक ऑटो रिक्षांची व्यवस्था : महिला करणार सारथ्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीरोजी होणाऱ्या भव्य दिव्य ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी राम भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. प्रशासनाची सर्व सोयी- सुविधा देण्यासाठी कंबर कसली आहे. परिवहन विभागाने ‘रामभक्तां’साठी महिला चालक असलेल्या नवीन डिझाइन केलेल्या इलेक्ट्रिक पिंक ऑटो रिक्षाची विशेष व्यवस्था केली आहे.   Ram Pran Pratishtha ceremony … The post अयोध्येत रामभक्तांसाठी पिंक ऑटो रिक्षांची व्यवस्था : महिला करणार सारथ्य appeared first on पुढारी.

अयोध्येत रामभक्तांसाठी पिंक ऑटो रिक्षांची व्यवस्था : महिला करणार सारथ्य

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीरोजी होणाऱ्या भव्य दिव्य ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी राम भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. प्रशासनाची सर्व सोयी- सुविधा देण्यासाठी कंबर कसली आहे. परिवहन विभागाने ‘रामभक्तां’साठी महिला चालक असलेल्या नवीन डिझाइन केलेल्या इलेक्ट्रिक पिंक ऑटो रिक्षाची विशेष व्यवस्था केली आहे.   Ram Pran Pratishtha ceremony
नवीन डिझाइन केलेल्या इलेक्ट्रिक पिंक ऑटो रिक्षा प्रदूषणमुक्त अयोध्या करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी या रिक्षांतून लोकांची वाहतूक केली जाणार आहे. आज (दि. १४) यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गुलाबी रिक्षांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. Ram Pran Pratishtha ceremony

#WATCH | Uttar Pradesh: Newly-introduced women-driven Pink autos to give ‘Ram Bhakts’ a tour of Ayodhya. (13.01) pic.twitter.com/YyIHHCj2Mt
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2024

५५ देशातील प्रमुखांनाल आमंत्रण
दरम्यान,  अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी देशभरात प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत हा सोहळा होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्‍यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर ५५ देशांतील प्रमुखांना आमंत्रण देण्‍यात आले आहे. ( 55 Countries Heads Invited For Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony )
विश्व हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद सदस्यांसह 55 देशांच्या सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय आणि इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आणि प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आले होते.
हेही वाचा 

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रम धार्मिक नसून पुर्णपणे राजकीय, भाजपच्या टीकेवर कॉंग्रेसचा पलटवार
राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : उत्तर प्रदेशच्‍या बाजारपेठांमध्‍ये हाेणार तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल
Ram Pran Pratishtha ceremony : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत १०० चार्टर्ड विमाने उतरणार

Latest Marathi News अयोध्येत रामभक्तांसाठी पिंक ऑटो रिक्षांची व्यवस्था : महिला करणार सारथ्य Brought to You By : Bharat Live News Media.