परभणी : नमो सुधार योजनेंतर्गत प्राचीन मंदिरे व बारवांना निधी मंजूर

सेलू , पुढारी वृत्तसेवा : नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मंदिरे व गोकुळेश्वर मंदिर बारव, वालूर येथील हेलिकल स्टेपवेल व चतुरस्त्र बारव तसेच एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील सिद्धेश्वर मंदिर बारव यांचा समावेश करण्यात आला आहे. वालूरची प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल ही नुकतीच पोस्टाच्या टपाल तिकिटावर जाऊन आयकॉन बनली आहे. आता तिचा या नमो … The post परभणी : नमो सुधार योजनेंतर्गत प्राचीन मंदिरे व बारवांना निधी मंजूर appeared first on पुढारी.

परभणी : नमो सुधार योजनेंतर्गत प्राचीन मंदिरे व बारवांना निधी मंजूर

सेलू , पुढारी वृत्तसेवा : नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मंदिरे व गोकुळेश्वर मंदिर बारव, वालूर येथील हेलिकल स्टेपवेल व चतुरस्त्र बारव तसेच एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील सिद्धेश्वर मंदिर बारव यांचा समावेश करण्यात आला आहे. वालूरची प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल ही नुकतीच पोस्टाच्या टपाल तिकिटावर जाऊन आयकॉन बनली आहे. आता तिचा या नमो सुधार योजनेत समावेश झाल्याने सर्व जिल्हावासीय तसेच वालूर, चारठाणा येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अभिनव अभियानांतर्गत ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर व बारवांचे डिजिटल दर्शन घडवणे, तसेच परिसर सुशोभीकरण करणे व स्वच्छतेबाबतची कामे केली जाणार आहेत. एकूण ७३ स्थळांची निवड केली जाणार असून सर्व ठिकाणांची माहिती क्यूआरकोडद्वारे दिली जाणार आहे. या ठिकाणी नकाशे डिजिटल करून लावण्यात येणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील वालूर येथील समस्त ग्रामस्थांनी कुदळ, फावडे, टोपले हातात घेऊन स्वच्छ व सुंदर केलेल्या व सध्या प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल व चतुरस्त्र बारव या दोन्ही बारवांचा यात समावेश आहे. चारठाणा येथील गोकुळेश्वर मंदिर व बारव, खुराची आई देवी मंदिर, महादेव मंदिर (जोड मंदिर) उकंडेश्वर मंदिर व गणपती मंदिर चारठाणा या प्राचीन मंदिरांचा यात समावेश आहे. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील प्राचीन मंदिर म्हणून प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या बारावसुद्धा यात समाविष्ट करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी घेतलेल्या मेहनतीची शासनाने निधी उपलब्ध करून नोंद घेतली आहे. पुढच्या पिढीसाठी या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे, हीच माफक अपेक्षा
– संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल, मारुती बोडखे (बारव संवर्धन समिती, वालूर)
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा विकास होणार आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. यातून जिल्ह्यातील वारस संगोपनाच्या कार्याला निश्चितच बळ मिळून कार्यकर्त्याचा उत्साह वाढणार आहे.
– मल्हारीकांत देशमुख, ऐतिहासिक मंदिरे, बारव बचाव मोहीम समन्वक, परभणी

हेही वाचा 

परभणी : सार्वजनिक कार्यक्रम टाळणार, विरोधानंतर आमदार गुट्टे यांची भूमिका
परभणी : मानवतला पाडव्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होणार
परभणी : पुनकळस पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

The post परभणी : नमो सुधार योजनेंतर्गत प्राचीन मंदिरे व बारवांना निधी मंजूर appeared first on पुढारी.

सेलू , पुढारी वृत्तसेवा : नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मंदिरे व गोकुळेश्वर मंदिर बारव, वालूर येथील हेलिकल स्टेपवेल व चतुरस्त्र बारव तसेच एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील सिद्धेश्वर मंदिर बारव यांचा समावेश करण्यात आला आहे. वालूरची प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल ही नुकतीच पोस्टाच्या टपाल तिकिटावर जाऊन आयकॉन बनली आहे. आता तिचा या नमो …

The post परभणी : नमो सुधार योजनेंतर्गत प्राचीन मंदिरे व बारवांना निधी मंजूर appeared first on पुढारी.

Go to Source