घरे खाली करा; अन्यथा कारवाई; रेल्वे प्रशासनाची घरमालकांना नोटीस

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील पंचशीलनगर, फैलवाली चाळ व मरीमातानगरमधील 1200 घरमालकांना 31 जानेवारीपर्यंत घरे खाली करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. त्यामुळे या ठिकाणी 70 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ‘आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय ही कारवाई करू नका,’ असा सूर येथील नागरिकांतून उमटत आहे. या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी … The post घरे खाली करा; अन्यथा कारवाई; रेल्वे प्रशासनाची घरमालकांना नोटीस appeared first on पुढारी.

घरे खाली करा; अन्यथा कारवाई; रेल्वे प्रशासनाची घरमालकांना नोटीस

मुंढवा : Bharat Live News Media वृत्तसेवा : घोरपडी येथील पंचशीलनगर, फैलवाली चाळ व मरीमातानगरमधील 1200 घरमालकांना 31 जानेवारीपर्यंत घरे खाली करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. त्यामुळे या ठिकाणी 70 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ‘आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय ही कारवाई करू नका,’ असा सूर येथील नागरिकांतून उमटत आहे.
या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी ही जागा त्यांच्या मालकीची असल्याचे कागदोपत्री सिध्द करावे. याबाबत रेल्वे प्रशासनाने फेब—ुवारी 2023 मध्ये येथील नागरिकांना नोटीस दिली होती. मात्र, नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. रेल्वेच्या नोंदीनुसार येथील फैलवाली चाळ, पंचशीलनगर व मरिमातानगर ही जागा रेल्वेच्या मालकीची आहे.
त्यामुळे येथील रहिवाशांनी येत्या पंधरा दिवसांत येथील जागा रिकामी करावी; अन्यथा रेल्वे प्रशासकडून कारवाई करून ही जागा रिकामी केली जाईल, असे या नोटिशीत नमूद केले आहे. वरील तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास 1200 घरे आहेत. या ठिकाणी सुमारे सात ते आठ हजार नागरिक राहतात. रेल्वे प्रशासनाने मे 2023 मध्येही येथील घरांना नोटीस बजावली होती. मात्र, नंतर कारवाई झाली नव्हती. आता मागील दोन-तीन दिवसांपूर्वी पुन्हा येथील घरांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे प्रशासनास देणार निवेदन
याविषयी येथील नागरिक येत्या दोन-तीन दिवसांत रेल्वे प्रशासनाला कारवाई थांबविण्याबाबत निवेदन देणार आहेत. कारवाईविषयी रेल्वे अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ’आम्ही येथील घरांना नोटिसा दिल्या असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करणार आहोत,’ असे सांगण्यात आले आहे.
निवडणुका आल्या की नोटिसा!
घोरपडी येथील पंचशीलनगर, मरिमातानगर व फैलवाली चाळ या ठिकाणी मागील 70 वर्षांपासून नागरिक राहत आहेत. ही जागा रेल्वेची नाही. रेल्वे या जागेवर हक्क कसा सांगत आहे? असा सूर नागरिकांमध्ये आहे. निवडणुकांमध्ये मतांच्या राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
नागरिक इथे मागील 70 वर्षांपासून
राहत आहेत. आमचे योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाने
कारवाई करू नये.
– राज राजपूत, रहिवासी
आमची तिसरी पिढी या जागेवर राहत आहे. आमच्याकडे या जागेची कागदपत्रे नसल्याने रेल्वे प्रशासन आम्हास वेठीस धरत आहे. आमच्या घरांवर कारवाई करून आम्हास बेघर करू नये.
– श्रीनिवास लादे, रहिवासी

हेही वाचा

ड्रायव्हर चहा घ्यायला उतरताच अज्ञाताने २ कोटींची ATM कॅश व्हॅन पळवली
परराष्‍ट्र धोरण : वेध जागतिक सत्ताकारणाचा
Milind Deora : मिलिंद देवारांकडून काँग्रेसला सोडचिठ्ठी; सर्व पदांचा राजीनाम

Latest Marathi News घरे खाली करा; अन्यथा कारवाई; रेल्वे प्रशासनाची घरमालकांना नोटीस Brought to You By : Bharat Live News Media.