बनावट विदेशी स्क्वॉचच्या कारखान्यावर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट विदेशी स्क्वॉच तयार करणार्‍या कारखान्यावर छापा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कात्रज परिसरातील देहूरोड बायपास, आंबेगाव बु. येथे हा कारखाना सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महेशभाई हरिभाई कोळी (रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक … The post बनावट विदेशी स्क्वॉचच्या कारखान्यावर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई appeared first on पुढारी.

बनावट विदेशी स्क्वॉचच्या कारखान्यावर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट विदेशी स्क्वॉच तयार करणार्‍या कारखान्यावर छापा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कात्रज परिसरातील देहूरोड बायपास, आंबेगाव बु. येथे हा कारखाना सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महेशभाई हरिभाई कोळी (रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि. 12) रात्री करण्यात आली. देहूरोड बायपास रोड स. नं. 3, आंबेगाव बुद्रुक येथे बनावट विदेशी स्क्वॉच बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी आंबेगाव बु. येथील कारखान्यावर दारूबंदी गुन्ह्यांतर्गत छापा टाकला. या ठिकाणावरून बनावट विदेशी स्क्वॉचच्या 34 सिलबंद बाटल्या, दोन दुचाकी वाहने, 551 रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बूच, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लास्टिक पॅकिंग रोल, प्लास्टिक चिकटपट्टी आणि मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 39 हजार 747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारखान्यात विदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यात पुन्हा मद्य भरून त्याची विक्री केली जात होती. हे मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरांमध्ये पाठविले जात होते. तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या महेशभाई कोळी याने पथकाला दिली. ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन. एन. मारकड, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एस. लोहकरे, एस. एस. इंदलकर, जवान व वाहनचालक जवान शरद भोर, गोपाल कानडे व महिला जवान उज्ज्वला भाबड यांच्या पथकाने केली. दाखल गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभू शेवाळे करीत आहेत.
हेही वाचा

काम झालंय.. मास्टरमाइंडला कळवा; आरोपींचा फोन
अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष
आता मोहीम सेव्हन स्टारची; स्वच्छतेमध्ये सुधारणेसाठी पालिका कामाला

Latest Marathi News बनावट विदेशी स्क्वॉचच्या कारखान्यावर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.