Pune Crime News : सराईत गुन्हेगाराचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कर परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अज्ञात व्यक्तींनी डोक्यात कठीण वस्तूने वार करीत खून केला. या गुन्हेगारावर तब्बल 25 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर दोनवेळा तडीपारी आणि तीनवेळा महाराष्ट्र झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्या (एमपीडीए)अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातून तो नुकताच बाहेर सुटला … The post Pune Crime News : सराईत गुन्हेगाराचा खून appeared first on पुढारी.

Pune Crime News : सराईत गुन्हेगाराचा खून

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लष्कर परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अज्ञात व्यक्तींनी डोक्यात कठीण वस्तूने वार करीत खून केला. या गुन्हेगारावर तब्बल 25 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर दोनवेळा तडीपारी आणि तीनवेळा महाराष्ट्र झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्या (एमपीडीए)अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातून तो नुकताच बाहेर सुटला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एक गुन्हा केला होता. प्रतिस्पर्धी टोळीतील व्यक्तीने हा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख (रा. चुडामल तालीम, भवानी पेठ) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा खून चार व्यक्तींनी केला असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. शेखवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत 25 गुन्हे दाखल आहेत. त्याला एमपीडीएअंतर्गत स्थानबध्द करण्यात आले होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास लष्कर पोलिस ठाण्यास एक कॉल आला. भांडणातून एका व्यक्तीस मारहाण झाली असून, तो जखमी अवस्थेत पडला असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी मार्शल गेल्यावर शेखच्या डोक्यात दगड किंवा अवजड वस्तूने मारहाण झाल्याने गंभीर जखमा झालेल्या दिसल्या. रुग्णवाहिका बोलावली असता तो मृत असल्याचे आढळले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी भेट दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेखला दोनवेळा तडीपार करण्यात आले होते, तर एमपीडीएअंतर्गत तीनवेळा स्थानबध्द केले गेले होते. दोन महिन्यांपूर्वीही त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने ती उच्च न्यायालयातून रद्द करून घेतली. अरबाजविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, लहान मुलीचा विनयभंग, जमाव जमवून घरात घुसून मारहाण करणे, धमकी, खंडणी यांसारखे गुन्हे आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 2017 मध्ये त्यास दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, त्याने संबंधित आदेशाचे उल्लंघन केले तसेच त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.
हेही वाचा

IND vs AFG : विराटचे पुनरागमन; बाहेर कोण?
माझ्या खात्यामुळे देशातील 40 टक्के प्रदूषण : नितीन गडकरी
कोल्हापूर जिल्ह्यात नवे 68 कुष्ठरुग्ण; आरोग्य यंत्रणा हादरली

Latest Marathi News Pune Crime News : सराईत गुन्हेगाराचा खून Brought to You By : Bharat Live News Media.