आजारी मालकाबरोबर जाण्यासाठी श्वानाचा हट्ट

लंडन : मुके प्राणीही माणसासारख्याच भावना दर्शवत असतात. त्यांनीही आपल्या मालकाला लळा लावलेला असतो. विशेषतः श्वानांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येते. आताही अशाच एका श्वानाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका आजारी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात असताना त्याच्या श्वानाने सोबत जाण्याचा भुंकून भुंकून हट्ट धरला व ते रुग्णवाहिकेभोवती फेर्‍या मारू लागले! ‘एक्स’ (ट्विटर) … The post आजारी मालकाबरोबर जाण्यासाठी श्वानाचा हट्ट appeared first on पुढारी.

आजारी मालकाबरोबर जाण्यासाठी श्वानाचा हट्ट

लंडन : मुके प्राणीही माणसासारख्याच भावना दर्शवत असतात. त्यांनीही आपल्या मालकाला लळा लावलेला असतो. विशेषतः श्वानांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येते. आताही अशाच एका श्वानाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका आजारी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात असताना त्याच्या श्वानाने सोबत जाण्याचा भुंकून भुंकून हट्ट धरला व ते रुग्णवाहिकेभोवती फेर्‍या मारू लागले!
‘एक्स’ (ट्विटर) वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये दिसते की या व्यक्तीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आले. त्यावेळी हा कुत्रा त्याच्यासमवेत राहण्यासाठी आत उडी मारून जातो. मात्र, कर्मचारी त्याला बाहेर काढून दार लावून घेतात. त्यावेळी हा श्वान ड्रायव्हरच्या खिडकीजवळ जाऊन भुंकू लागतो व रुग्णवाहिकेभोवती घिरट्या घालू लागतो. त्यामुळे या वाहनाला पुढे जाणे कठीण होते. अखेर कर्मचारी रुग्णवाहिकेचे दार उघडून त्यालाही आत घेतात.
‘मालकासोबत रुग्णवाहिकेत राहण्यासाठी श्वान विलक्षण प्रयत्न करतो. या साथीदाराचे महत्त्व ओळखून ‘रुग्णवाहिका टीमचे एक चांगले काम’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या टीमने श्वानाला मालकाशेजारीच बसून रुग्णालय गाठले! अर्थातच या व्हिडीओला अनेक लाईक्स मिळाले आहेत.
Latest Marathi News आजारी मालकाबरोबर जाण्यासाठी श्वानाचा हट्ट Brought to You By : Bharat Live News Media.