कोल्हापूर : आजऱ्यातील पारेवाडीनजीक दुचाकीस्वाराला रिक्षाची धडक, तरुण जागीच ठार

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा-आंबोली मार्गावर पारेवाडीतील एका हॉटेलनजीक मोटरसायकल व रिक्षाच्या अपघातात तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज (दि. १३) सायंकाळी घडली. पंकज शिवाजी पाटील (वय २८, रा. मुरूडे ता. आजरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज हा पणजी येथे एका कंपनीत काम करत होता. शनिवार व रविवार सुट्टी … The post कोल्हापूर : आजऱ्यातील पारेवाडीनजीक दुचाकीस्वाराला रिक्षाची धडक, तरुण जागीच ठार appeared first on पुढारी.

कोल्हापूर : आजऱ्यातील पारेवाडीनजीक दुचाकीस्वाराला रिक्षाची धडक, तरुण जागीच ठार

आजरा; Bharat Live News Media वृत्तसेवा : आजरा-आंबोली मार्गावर पारेवाडीतील एका हॉटेलनजीक मोटरसायकल व रिक्षाच्या अपघातात तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज (दि. १३) सायंकाळी घडली. पंकज शिवाजी पाटील (वय २८, रा. मुरूडे ता. आजरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज हा पणजी येथे एका कंपनीत काम करत होता. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने पणजीहून मोटारसायकलने घरी येत होता. संध्याकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास आजरा-आंबोली मार्गावरील पारेवाडी तिट्टयाजवळ सरकार हॉटेल शेजारी एका टेम्पोला ओव्हरटेक करताना समोरून येणा-या रिक्षाने जोराची धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पंकज जागीच ठार झाला. हा इतका भीषण आपघात झाला. यामध्ये मोटरसायकलचा चक्काचूर झाला.
यावेळी प्रवासी व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची आजरा पोलिसात नोंद झाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पश्च्यात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : आजऱ्यातील पारेवाडीनजीक दुचाकीस्वाराला रिक्षाची धडक, तरुण जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.