नागपूर : आंभोरा येथील ‘स्टेट ऑफ आर्ट’ केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र आंभोरा येथील वैनगंगा नदीवर नवनिर्मित केबल-स्टेड पूल, पुलावरील आकर्षक प्रेक्षक गॅलरी, याठिकाणी भविष्यात सुरू होणारे वॉटर स्पोर्ट्स आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचे उपक्रम, लाईट अँड साऊंड शो देशभरातील पर्यटकांना आकर्षित करेल. त्यातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त … The post नागपूर : आंभोरा येथील ‘स्टेट ऑफ आर्ट’ केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण appeared first on पुढारी.
नागपूर : आंभोरा येथील ‘स्टेट ऑफ आर्ट’ केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र आंभोरा येथील वैनगंगा नदीवर नवनिर्मित केबल-स्टेड पूल, पुलावरील आकर्षक प्रेक्षक गॅलरी, याठिकाणी भविष्यात सुरू होणारे वॉटर स्पोर्ट्स आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचे उपक्रम, लाईट अँड साऊंड शो देशभरातील पर्यटकांना आकर्षित करेल. त्यातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. Nagpur News
भारत सरकारच्या सेंट्रल रोड फंड अंतर्गत आंभोरा येथे वैनगंगा नदीवर अतिशय आकर्षक असा केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे लोकार्पण आज (दि.१३)  नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार राजू पारवे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, डॉ. राजीव पोतदार, श्याम बाबू दुबे, बाबा तितरमारे, चैतन्येश्वर मंदिराचे विश्वस्त ठवकर, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प स्थानिकांचे जीवन आनंददायी करणारा ठरेल, असेही गडकरी म्हणाले. Nagpur News
‘केबल-स्टेड पूल हा एक स्टेट ऑफ आर्ट प्रकल्प ठरला आहे. येथील उत्तम प्रकाशयोजना, पुलाच्या मध्यभागी टॉवरवर असणारी व्हिवींग गॅलरी आणि चहुबाजुंनी असलेला निसर्ग केवळ विदर्भातीलच नव्हे तर देशातील पर्यटकांना आकर्षित करेल असा मला विश्वास आहे. देशाला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. पूर्वी भंडारा जिल्ह्यातील लोक नदीतून बोटीने प्रवास करीत चैतन्येश्वर मंदिरात दर्शनासाठी यायचे. याठिकाणी कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा आणि कोलार अशा पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगेच्या साक्षीने आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेक सिंधू शके’ हा ग्रंथ लिहीला. पर्यटनाच्या दृष्टीने आंभोरा भागाला महत्त्व प्राप्त होणार आहे, २५० कोटी रुपयांच्या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
Nagpur News पर्यटनाचे नवे केंद्र – फडणवीस
आंभोरा हे विदर्भातील पर्यटनाचे नवे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यानंतर सर्वांनी श्री क्षेत्र आंभोरा येथील चैतन्येश्वर मंदिरात दर्शन घेतले. गडकरी-फडणवीस यांनी एकत्रित केलेले फोटोसेशनही लक्षवेधी ठरले.
 असा आहे केबल-स्टेड पूल
७०० मीटर लांबीच्या या पुलासाठी केंद्रीय रस्ते निधीमधून (सीआरएफ) १७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या भागातील एकूणच पर्यटन विकास व सौंदर्यीकरणासाठी राज्य सरकारच्या वतीने ३५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुलाच्या मध्यभागी ४० मीटर उंचीचे दोन टॉवर्स असून त्याच्या शीर्षभागी आकर्षक प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. येथे जाण्यासाठी पायऱ्या व लिफ्ट अशी व्यवस्था असून व्हिविंग गॅलरीच्या ठिकाणी लवकरच रेस्टॉरंट देखील सुरू होणार आहे. ३ हजार चौरस फुटांच्या या गॅलरीमध्ये एकावेळी 150 लोक बसू शकतात, अशी व्यवस्था आहे. पुलावर आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली असून रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा पर्यटकांना विशेषत्वाने आकर्षित करणार आहे.
हेही वाचा 

नागपूर : वेदमूर्ती गोविंदशास्त्री आर्वीकर यांचे निधन
नागपूर : महायुतीच्या बैठकीत परस्परांविरोधातील नेते मांडीला मांडी लावून बसले
नागपूर : ‘परीक्षांवर बहिष्कार’साठी श‍िक्षण मंडळाला महामंडळाचे पत्र

Latest Marathi News नागपूर : आंभोरा येथील ‘स्टेट ऑफ आर्ट’ केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण Brought to You By : Bharat Live News Media.