खडकवासला साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाणी

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना पिण्याचे तसेच 66 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा तब्बल पावणेदोन टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशावरून जलसंपदा विभागाने तूट भरून काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. गुरुवारअखेर (दि. 16) धरण साखळीत 26.26 टीएमसी म्हणजे 90.06 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. … The post खडकवासला साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाणी appeared first on पुढारी.

खडकवासला साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाणी

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना पिण्याचे तसेच 66 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा तब्बल पावणेदोन टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशावरून जलसंपदा विभागाने तूट भरून काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. गुरुवारअखेर (दि. 16) धरण साखळीत 26.26 टीएमसी म्हणजे 90.06 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी आजच्या दिवशी धरणसाखळीत 28.02 टीएमसी म्हणजे 96.09 टक्के पाणी होते. गतवर्षी तुलनेत 1.76 टीएमसी कमी पाणी आहे. हवेली, दौंड, इंदापूरसह जिल्ह्यातील शेतीला खडकवासला धरणातून दि. 25 नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात येणार आहे. धरण क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा 25 ते 30 टक्के कमी पाऊस पडला. त्याचा सर्वात मोठा फटाका उजनी धरणाला बसला आहे.
परतीच्या पावसामुळे धरण साखळीला थोडा दिलासा मिळाला; मात्र गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीतील सर्वच धरणांत सध्या कमी पाणी आहे. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात 1.10 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यातील 0.59 टीएमसी पाणी परतीच्या पावसामुळे सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे. गेल्या 10 वर्षांत प्रथमच यंदा खडकवासलातून कमी पाणी मुठा नदीत सोडले. गेल्या वर्षी जवळपास 10 टीएमसीपेक्षा अधिक पाणी मुठा नदीत सोडले होते. यंदा केवळ 1.10 टीएमसी पाणी सोडले आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तरी टेमघर वगळता तीनही धरणे 100 टक्के भरल्याने पावसाळी हंगामात खडकवासलातून मुठा कालव्यातून जादा  पाणी सोडण्यात आले. त्याचा लाभ हा लाभ क्षेत्रातील शेतीला झाला. गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे धरण साखळीला मोठी आवक झाली नाही. मात्र टंचाईच्या काळात पाण्याची किंचितशी भर पडली.
प्रशासनाचे धरण साखळीवर लक्ष
सध्या धरण साखळी 90 टक्क्यांवर आहे. शहर व परिसराला पिण्यासाठी पुरेसे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणसाठ्यात घट सुरू आहे. रब्बी आवर्तन सुरू झाल्यानंतर आगामी 2 ते 3 महिन्यांत पाणी साठ्यात घट होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्यासह शेतीला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने खडकवासला धरण साखळीवर लक्ष केंद्रित केले आहे. पाण्याची गळती, चोरी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच पिण्याच्या व शेतीच्या पाण्यात काटकसर करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
धरणांतील सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये (टक्केवारी)
टेमघर 2.47( 66.47), वरसगाव 12.02 (93.71), पानशेत 10.40 (97.65), खडकवासला 1.38 (69.77). चार धरणांच्या धरण साखळीची एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे.
गतवर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीत पावणेदोन टीएमसी कमी पाणी आहे. पाण्याची तूट भरून काढण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी महापालिकेला सूचना दिल्या आहेत. दि. 25 नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. सहा ते साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग
The post खडकवासला साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाणी appeared first on पुढारी.

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना पिण्याचे तसेच 66 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा तब्बल पावणेदोन टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशावरून जलसंपदा विभागाने तूट भरून काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. गुरुवारअखेर (दि. 16) धरण साखळीत 26.26 टीएमसी म्हणजे 90.06 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. …

The post खडकवासला साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाणी appeared first on पुढारी.

Go to Source