Pimpari : देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने हरित सेतू उपक्रम राबविणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग व नावीन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. सार्वजनिक परिसर पादचार्‍यांसाठी, लहान मुलांसाठी व रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम अंमलात आणणार आहोत. त्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन … The post Pimpari : देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने हरित सेतू उपक्रम राबविणार appeared first on पुढारी.

Pimpari : देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने हरित सेतू उपक्रम राबविणार

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग व नावीन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. सार्वजनिक परिसर पादचार्‍यांसाठी, लहान मुलांसाठी व रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम अंमलात आणणार आहोत. त्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.12) केले.
स्मार्ट सिटी अभियानअंतर्गत शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास’ या राष्ट्रीय कार्यशाळा आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे आज सुरू झाली. त्या आयुक्त बोलत होते.
या वेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उपायुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, शिरीष पोरेडी, लक्ष्मीकांत कोल्हे तसेच, 43 शहरांमधील स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्त्व रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पैलूंवर काम करण्यात येत आहे.
त्यामध्ये रस्त्यांचा आणि सार्वजनिक परिसरांचा विकास होणे गरजेचे असून या कार्यशाळेच्या माध्यमातून हे ध्येय साध्य होण्यास नक्कीच मदत मिळेल. हरित सेतूची शाश्वत अंमलबजावणी करण्यासाठी ग्रीन बॉण्ड व सायकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट (बीआयसीआय) चा वापर केला जाईल. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट पॉलिसीच्या शाश्वत मोबिलिटीच्या प्रांजली देशपांडे आणि ट्रॅफिक ऑपरेशन्स व्यावसायिक प्रताप भोंसले यांसारख्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील सत्रांनी, रस्त्याच्या डिझाइनमध्ये डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. स्मार्ट सिटी सल्लागार अमर करण यांनी कार्यशाळेत प्रभावी स्ट्रीट डिझाईन प्रकल्प राबविण्याच्या गुंतागुंतीवर अभ्यासपुर्ण सादरीकरण केले. त्यांनी धोरणात्मक आव्हाने नमूद करत, कार्यक्षम आणि उपयुक्त रस्ते तयार करण्याच्या दृष्टीकोणांवर भर दिला. विकास ठकार यांनी रस्त्यावरील डिझाईन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आव्हाने कमी करण्यासाठी अंमलात येणार्या धोरणांची माहिती दिली. कार्यशाळेत निखिल कन्स्ट्रक्शन, शिवम इंडस्ट्रीज आणि स्नेह प्रीकास्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात रस्ते सौंदर्यीकरण आणि विकासकामांमध्ये वापरल्या जाणार्‍या सिमेंट, काँक्रीटच्या साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.
Latest Marathi News Pimpari : देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने हरित सेतू उपक्रम राबविणार Brought to You By : Bharat Live News Media.