Pune : मांजाची विक्री करणार्याला बेड्या
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बंदी असलेल्या चायनीज नायलॉन मांजाची विक्री करणार्या एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 45 हजार 600 रुपयांचा मांजा जप्त केला आहे. सैफ वाजीदअली खान (वय 26, रा. बालाजीनगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे.
या ऑपरेशनदरम्यान पोलिस अंमलदार तुषार आल्हाट आणि सुहास निगडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बालाजीनगर वडगाव शेरीमध्ये एका पत्राशेडमध्ये बंदी असलेल्या चायनीज नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिस अंमलदार तुषार आल्हाट आणि सुहास निगडे यांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून सैफ खान आणि त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 45 हजार 600 रुपयांचा मांजा जप्त केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कवतिके, नीलेश घोरपडे, पोलिस अंमलदार नीलेश शिर्के, सुहास निगडे, तुषार आल्हाट, गणेश डोंगरे, सचिन कळसाईत यांच्या पथकाने केली.
हेही वाचा :
Pune News : पाणीपुरवठ्याच्या कामाला पुन्हा वर्षभर मुदतवाढ
Kunbi Maratha Records : मराठा म्हणजे कुणबीच नोंद सापडली?
Latest Marathi News Pune : मांजाची विक्री करणार्याला बेड्या Brought to You By : Bharat Live News Media.