Accident : ट्रकखाली चिरडून मोपेड स्वार महिलेचा जागीच मृत्यू

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या भरघाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातामध्ये पानसरे गल्लीतील रहिवासी असणाऱ्या सौ. नीतू सोमनाथ परदेशी वय ३७ ही महिला त्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी१०वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कॉर्नरजवळ घडली. याबाबत संगमनेर शहर … The post Accident : ट्रकखाली चिरडून मोपेड स्वार महिलेचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Accident : ट्रकखाली चिरडून मोपेड स्वार महिलेचा जागीच मृत्यू

संगमनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या भरघाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातामध्ये पानसरे गल्लीतील रहिवासी असणाऱ्या सौ. नीतू सोमनाथ परदेशी वय ३७ ही महिला त्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी१०वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कॉर्नरजवळ घडली.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की पुणे नाशिक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बसस्थानकाकडून भरघाव वेगाने तीन बत्ती चौकाकडे जाणारा रिकामा ट्रक (क्र .एम.एच.20/ ए 5858) याने महामार्ग ओलांडत असणाऱ्या सौ नीतू सोमनाथ परदेशी (वय ३७, रा. पानसरे गल्ली, नेहरु चौक) यांच्या मोपेड दुचाकीला जोराची धडक बसली. असता सौ परदेशी यांची मोपेड ट्रकखाली अडकली. त्यावेळी त्या ट्रकचालकाने ब्रेक लावण्याचा ही प्रयत्न केला.
मात्र ट्रक जागेवर न थांबता काही अंतर पुढे गेला. अन पुढील चाकाखालून वाचलेल्या सौ परदेशी पाठीमागील चाका खाली सापडून चिरडल्या गेल्या.जखमी अवस्थेत त्यांना परिसरातील नागरिकांनी खासगी वाहनातून एका खाजगी रुग्णा लयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताची माहिती संगम नेर शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा

बसस्थानक व्यापारी संकुलाची 14 कोटींच्या कामाची निविदा
आशा स्वयंसेविकांच्या प्रश्नांवर आवाज उठवू : राम शिंदे
हार-जीत पचविण्याची ताकद मैदानी खेळातून : आ. मोनिका राजळे

Latest Marathi News Accident : ट्रकखाली चिरडून मोपेड स्वार महिलेचा जागीच मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.