हार-जीत पचविण्याची ताकद मैदानी खेळातून : आ. मोनिका राजळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मैदानी खेळातून माणसाच्या आयुष्यात मोठा बदल होऊन हार-जीत पचवण्याची ताकद आपल्यात निर्माण होते, असे प्रतिपादन आ. मोनिका राजळे यांनी केले. भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित नमो चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आज क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत एकूण 40 संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी शहरातील वीर सावरकर … The post हार-जीत पचविण्याची ताकद मैदानी खेळातून : आ. मोनिका राजळे appeared first on पुढारी.

हार-जीत पचविण्याची ताकद मैदानी खेळातून : आ. मोनिका राजळे

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : मैदानी खेळातून माणसाच्या आयुष्यात मोठा बदल होऊन हार-जीत पचवण्याची ताकद आपल्यात निर्माण होते, असे प्रतिपादन आ. मोनिका राजळे यांनी केले. भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित नमो चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आज क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत एकूण 40 संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी शहरातील वीर सावरकर मैदान ते माळी बाभूळगाव पेट्रोल पंपापर्यंत पायी चालण्याची तीन किलोमीटरची स्पर्धा घेण्यात आली.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उमेश भालसिंग, अभय आव्हाड, माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, अजय भंडारी, अ‍ॅड. विवेक नाईक, सतीश गुगळे, बाप्पूसाहेब पाटेकर, सुभाष बर्डे, अमोल गर्जे, संजय बडे, महेश बोरुडे, नामदेव लबडे, विष्णुपंत अकोलकर, मुकुंद लोहिया, अशोक चोरमले, शुभम गाडे, चारुदत्त वाघ, राहुल कारखेले, सागर फडके, डॉ. सुहास उरणकर, राष्ट्रीय खेळाडू कोमल वाळके, मंगल कोकाटे, आशा गरड, काशीबाई गोल्हार आदी उपस्थित होते.
आ. राजळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व युवकांना खेळाची गोडी लागण्यासाठी विविध मैदानी क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांचे स्पर्धा आयोजन केले आहे. खेळाने आपण आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो. सर्वांनी मैदानी खेळ खेळून शारीरिक तंदुरुस्ती साधावी. शारीरिक स्वास्थ व्यवस्थित असेल, तरच आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करू, असे आ. राजळे म्हणाल्या.
हेही वाचा

West Bengal : धक्कादायक! उत्तर प्रदेशच्या ३ साधूंना बंगालमध्ये जमावाकडून मारहाण, १२ जणांना अटक
Crime news : जेलची प्रतिकृती असलेला केक तलवारीने कापला
सरोज पाटील, शांतादेवी पाटील यांना राष्ट्रमाता जीवनगौरव पुरस्कार

Latest Marathi News हार-जीत पचविण्याची ताकद मैदानी खेळातून : आ. मोनिका राजळे Brought to You By : Bharat Live News Media.