येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, ६० ठिकाणांना केले लक्ष्य

पुढारी ऑनलाईन : लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांवर अमेरिकेने पुन्हा मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी पहाटे येमेनमधील हुथी नियंत्रित ठिकाणांवर हल्ले केले, अशी माहिती दोन अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. येमेनची राजधानी साना येथे मोठा स्फोट झाल्याचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे. अमेरिकेने शुक्रवारी पहिल्या दिवशी २८ ठिकाणांवरील सुमारे ६० … The post येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, ६० ठिकाणांना केले लक्ष्य appeared first on पुढारी.

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, ६० ठिकाणांना केले लक्ष्य

Bharat Live News Media ऑनलाईन : लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांवर अमेरिकेने पुन्हा मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी पहाटे येमेनमधील हुथी नियंत्रित ठिकाणांवर हल्ले केले, अशी माहिती दोन अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. येमेनची राजधानी साना येथे मोठा स्फोट झाल्याचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे. अमेरिकेने शुक्रवारी पहिल्या दिवशी २८ ठिकाणांवरील सुमारे ६० लक्ष्यांवर हल्ले केले.
रडार साइटचा सागरी वाहतुकीसाठी सतत धोका आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हुथी बंडखोरांवर आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला होता. हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनच्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नौदलाने येमेनचा लाल समुद्र आणि एडनच्या आखातातातून पुढील ७२ तास न जाण्याचा इशारा अमेरिकेच्या जहाजांना दिला होता. त्यानंतर पुन्हा अमेरिकेने हुथी बंडखोरांवर हल्ले केले आहेत. गाझामधील इस्रायलच्या युद्धामुळे आधीच ग्रस्त असलेल्या या प्रदेशात व्यापक संघर्ष होण्याची शक्यता आहे.
अमेरिकी सैन्य आणि व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांना असा अंदाज आहे की हुथी बंडखोर हल्ल्याला प्रत्युत्तर देतील. अलीकडील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बॉम्बहल्ले हे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांला प्रत्युत्तर म्हणून होते. हुथींनी दावा आहे की या हल्ल्यात किमान पाच लोक मारले गेले आणि सहा जखमी झाले.
अमेरिकेने म्हटले आहे की येमेनमधील हुथी नियंत्रित भागांवर, शस्त्रसाठा, रडार आणि दुर्गम पर्वतीय भागांसह लक्ष्यित ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पेनसिल्व्हेनियाच्या दौऱ्यादरम्यान सांगितले की अमेरिका हुथींच्या भ्याड हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल. ते हुथींना दहशतवादी गट मानता का असे विचारले असता, बायडेन यांनी त्यावर हो असे उत्तर दिले.
हे ही वाचा :

‘हुथी’वर अमेरिकेची कारवाई; लाल समुद्रात ३ जहाजांवर हल्‍ला, १० बंडखोर ठार
अमेरिका, ब्रिटनचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू
भूकंपाने भूगोल बदलला; बेटांची उंची वाढली, समुद्रही सरकला

Latest Marathi News येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, ६० ठिकाणांना केले लक्ष्य Brought to You By : Bharat Live News Media.