राम मंदिर अभिवादनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक

मुंबई; प्रमोद चुंचूवार : अटल सेतूच्या उद्घाटन समारंभात विरोधकांना रावण संबोधणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक उपस्थितांना श्रीराम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करायला लावून मास्टर स्ट्रोक खेळताना एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. एकीकडे हिंदुत्वाच्या राजकीय स्पर्धेत आपली बाजू कमकुवत होणार नाही याची काळजी घेतानाच दुसरीकडे 2024 च्या निवडणुकीत जर रामलाटेचा लाभ … The post राम मंदिर अभिवादनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक appeared first on पुढारी.

राम मंदिर अभिवादनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक

मुंबई; प्रमोद चुंचूवार : अटल सेतूच्या उद्घाटन समारंभात विरोधकांना रावण संबोधणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक उपस्थितांना श्रीराम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करायला लावून मास्टर स्ट्रोक खेळताना एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
एकीकडे हिंदुत्वाच्या राजकीय स्पर्धेत आपली बाजू कमकुवत होणार नाही याची काळजी घेतानाच दुसरीकडे 2024 च्या निवडणुकीत जर रामलाटेचा लाभ होणार असेल तर त्याचा आपल्याही पक्षाला राजकीय लाभ व्हायला हवा, याचीही तजवीज केली.
शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे मोदींचे गुणगान गात विरोधकांवर हल्ला चढविला. भाषणाची सुरूवातच त्यांनी जय श्रीराम या जयघोषात केली. भाषण संपताना मात्र त्यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न मोदींनी पूर्ण केल्याचे सांगत राम मंदिराची मागणी केवळ एकट्या भाजपची नव्हती तर शिवसेनेचीही होती, बाळासाहेबांचीही होती, याची अप्रत्यक्ष आठवणही त्यांनी करून दिली.
विधानसभा अध्यक्षांनी आता बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेनेची मालकी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविल्यानंतर राम मंदिराच्या लढ्याचे श्रेय बाळासाहेबांच्या निमित्ताने आपल्या शिवसेनेकडेही राहील, याची काळजी शिंदे यांनी या निमित्ताने घेतली.
अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होतेय, बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करीत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी उभे राहून त्याबद्दल मोदींना मानवंदना द्यायची आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थित भव्य जनसमुदायाला उभे राहण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः जय श्रीरामचा नारा देत उपस्थितांनाही जय श्रीरामचा नारा देण्यास सांगितले. त्यामुळे नवी मुंबईतील हे सभास्थळ जय श्रीरामच्या नार्‍यांनी गुंजले तेव्हा प्रत्यक्ष मोदींनीही स्वतः उभे राहत या अभिवादनाचा स्वीकार केला. यानिमित्ताने मोदींच्या अधिक जवळ जाण्याची, त्यांच्याप्रति आपण कसे निष्ठावान आहोत हे दाखवून देण्याची संधीही मुख्यमंत्री शिंदे यांनी साधली. या सभेसाठी महिला प्रामुख्याने कोकण व मुंबई परिसरातील असल्याने पुढील लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या नावाने आपल्यालाही मते मिळावीत, अशी रणनीतीही त्यामागे असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : 

गिरीश महाजन पुन्हा ठरले ‘संकटमोचक’! 
‘२२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण’
जळगाव : तीन मंत्र्यांसह आमदारांना आम सभेचा विसर

Latest Marathi News राम मंदिर अभिवादनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक Brought to You By : Bharat Live News Media.