जळगाव : महसूल कर्मचाऱ्यास मारण्याचा डंपर चालकाचा प्रयत्न
जळगाव- अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खननास आळा घालण्यासाठी वाहन थांबवित असताना महसूल पथकातील कर्मचारी यांच्या अंगावरती गाडी घालून जीवित मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भुसावळ चे तहसीलदार यांच्या गाडीला कट मारून नुकसान केले. याचबरोबर एका शेतकऱ्याच्या पिकात डंपर घालून पिकाचे नुकसान केले. याप्रकरणी तलाठी रजनी तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक करण्यावर कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवालचे संयुक्तिक पथक यांचे पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत. वाहनांवर कारवाई करण्यासाठी (दि. 11) रोजी पथक जात असताना जळगावकडून भुसावळकडे येणाऱ्या डंपर क्रमांक (एम एच 19 झेड 4679) तपासणी कामी थांबविण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने महसूल पथकातील कर्मचारी यांच्या अंगावरती गाडी घालून जीवित मारण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार भुसावळ यांच्या गाडीला कट मारून गाडीचे नुकसान केले व तेथून बोहाडी रस्त्यावर गाडी घालून चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठलाग करून वरणगाव पोलिसांनी व कर्मचाऱ्यांनी वाहन पकडले. अंधाराचा फायदा घेत वाहन चालक व मजूर पडून गेले. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात येत असून वाहनाचा पाठलाग करीत असताना एक टू व्हीलर वर अज्ञात व्यक्ती पोलिस वाहन व महसूल पथकातील वाहनांना अडथळा निर्माण करत होता. वाहन क्रमांक एम एच 19 डी डब्ल्यू 5950 असा असून त्यावर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेतकरी वाहन चालकाविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करीत आहे.
हेही वाचा :
Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोदींना साकडे, पुरोहित संघाने काय केली मागणी?
गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प
भूकंपाने भूगोल बदलला; बेटांची उंची वाढली, समुद्रही सरकला
Latest Marathi News जळगाव : महसूल कर्मचाऱ्यास मारण्याचा डंपर चालकाचा प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.