आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात ; चर्चेला उधाण

मंचर : शिवसेना उपनेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करून आगामी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला मतदारसंघात उधाण आले आहे. भाजपकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा होत असताना शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने आढळराव पाटील अस्वस्थ झालेले असल्याने आपल्याला सोयीचे राजकारण म्हणून अजित पवार गटाकडून … The post आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात ; चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात ; चर्चेला उधाण

संतोष वळसे-पाटील

मंचर : शिवसेना उपनेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करून आगामी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला मतदारसंघात उधाण आले आहे. भाजपकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा होत असताना शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने आढळराव पाटील अस्वस्थ झालेले असल्याने आपल्याला सोयीचे राजकारण म्हणून अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास तीव्र इच्छुक असल्याच्याही चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर आढळराव पाटील यांच्यासंबंधीच्या चर्चेची बातमी व्हायरल होत आहे.
आगामी लोकसभेच्या जागांवाटपामध्ये महायुतीत अजित पवार गटाने शिरूर लोकसभेसाठी दावा केला आहे. या जागेवर आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार गटाकडून होऊ लागल्याने आढळराव पाटील हे अजित पवार गटात जाणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सहभागी झाले. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी शिरूर लोकसभा मतदारसंघात आणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जनसंपर्क कायम ठेवला; परंतु गेल्या दोन वर्षांत भाजपकडून केंद्रीय मंत्र्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध दौरे, बैठका झाल्या.
भाजप पक्षाच्या वतीने लोकसभेचे उमेदवार म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही तयारी सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात असल्याने आढळराव पाटील यांना भाजपची चाल लक्षात येऊ लागल्याने ते मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागेसंदर्भात उमेदवारीबाबत आग्रही असताना शिंदे, अर्थात शिवसेनेकडून मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पण ते जर अजित पवार गटात आले तर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र या बातमी बाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत अमेरिका येथे सध्या असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क केला असता, आपण याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, व्हायरल होत असलेल्या बातमीने चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा :

बारामती : भाजी मंडईप्रश्नी शरद पवार थेट बारामती नगरपरिषदेत
Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्‍यावर येणार

The post आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात ; चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

मंचर : शिवसेना उपनेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करून आगामी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला मतदारसंघात उधाण आले आहे. भाजपकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा होत असताना शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने आढळराव पाटील अस्वस्थ झालेले असल्याने आपल्याला सोयीचे राजकारण म्हणून अजित पवार गटाकडून …

The post आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात ; चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

Go to Source