काँग्रेस नेते मिलिंद देवरा सोमवारपर्यंत शिंदे गटात

मुंबई : चंदन शिरवाळे : अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा हे सोमवारपर्यंत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात रीतसर प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. देवरा यांच्या सोडचिठ्ठीमुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबरदस्त … The post काँग्रेस नेते मिलिंद देवरा सोमवारपर्यंत शिंदे गटात appeared first on पुढारी.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा सोमवारपर्यंत शिंदे गटात

मुंबई : चंदन शिरवाळे : अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा हे सोमवारपर्यंत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात रीतसर प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. देवरा यांच्या सोडचिठ्ठीमुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबरदस्त हादरा बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देवरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांच्या संपर्कात होते. यावरून ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात काँग्रेस नेते मिलिंद देवरा सोमवारपर्यंत शिंदे गटात येत होती. मात्र, राजकीय चित्र पाहून देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशाबाबत ते मागील तीन दिवसांपासून आपल्या समर्थकांशी चर्चा करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार माजी नगरसेवक ज्ञानराज निकम, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील नरसाळे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष प्रमोद मांजरेकर यांच्यासह दक्षिण मुंबईतील निम्मे ब्लॉक अध्यक्ष देवरा यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.
गरवारे क्लब आणि मुंबई काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठका होत्या. या दोन्ही बैठकांकडे देवरा यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, विनंतीही केली होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
मिलिंद यांचे वडील दिवंगत मुरली देवरा हे अनेक वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. यास्तव मुंबईत त्यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही माजी आमदार देवरा यांच्यासोबत शिंदे गटात जातील, अशी शक्यता आहे. विद्यमान आमदार अमीन पटेल यांचेही त्यामध्ये नाव घेतले जाते. परंतु, आमदारकी रद्द होईल, या भीतीने विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी ते काँग्रेसमधून उडी मारतील, असे बोलले जात आहे.
देवरा यांनी पक्षीय सीमोल्लंघन करावे, यासाठी एका वजनदार उद्यागपतीने त्यांची मनधरणी केली होती. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवरा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Latest Marathi News काँग्रेस नेते मिलिंद देवरा सोमवारपर्यंत शिंदे गटात Brought to You By : Bharat Live News Media.