भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आरोग्यासाठी गुणकारी
मुंबई : आपले अनेक सण ऋ तुमानाशी, निसर्गाशी आणि आरोग्याशीही निगडित आहेत. जानेवारीच्या म्हणजेच नव्या आंग्ल वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी तिळगूळ देऊन सुगडी पुजण्याची प्रथा आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. खरं म्हणजे संक्रांतीनंतर ऋतुबदल होण्यास सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या या दिवसांत तीळाचे लाडू किंवा तीळ आणि गूळ घालून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. तसेच, काळे कपडे परिधान केले जातात. यामागेही वैज्ञानिक कारणे आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते. या भोगीच्या भाजीचा विशेष महत्त्व आहे. तसेच, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. (Makar Sankranti)
मकर संक्रांतीच्यादरम्यान वातावरणात गारवा असतो, त्यामुळे शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ आणि गुळाचे लाडू केले जातात. तीळ आणि गूळ दोघांचाही गुणधर्म गरम आहे. त्यामुळं या पदार्थांमुळे शरीरातील उष्णतेचा समान राहते. म्हणून मकर संक्रांतीला तीळगुळाचे लाडू किंवा चिक्की, असे पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर महिला वाण म्हणून सुगडी पुजतात. त्यामध्ये हरबरा, बोरं, गाजर भरून अर्पण करतात. ‘जो न खाई भोगी वो सदा रोगी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीमुळं लक्षात येईल की, ही भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात.
थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात. त्यामुळं या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. तसेच, या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीही उष्ण असल्याने ती शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते. भोगीच्या भाजीमध्ये वांगे, घेवडा, हरभरा, तरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा, पावटे या भाज्यांसारख्या थंडीत उपलब्ध होणार्या भाज्या वापरल्या जातात. तसेच, त्या व्यतिरिक्त भाजीत तीळ, शेंगदाणा, खोबरं आणि खसखस या उष्ण पदार्थांचा वापर जातो. हिवाळ्यात ही भाजी खूप आरोग्यदायी मानली जाते. (Makar Sankranti)
भोगीची भाजी ही आरोग्यवर्धक आहे. संधिवात, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतीभ्रंश, कर्करोगासारख्या रोगांवर गुणकारी आहे. तसेच, या भाजीत अनेक पोषकतत्त्वे आहेत. यात बी जीवनसत्वे, फोलेट, ओमेगा-3 फॅटस्, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लुटाथिओन सारखे गुणधर्म असतात. भोगीच्या भाजीत जीवसत्वे व खनिजे यांच्या चांगला स्रोत आहे. या भाजीत गाजर असल्याने डोळ्यांना पोषक तत्त्वांचा पुरवठा करतात. गॅस आणि पोट फुगणे कमी करण्यासही भाजी मदत करते. पचनक्रिया निरोगी ठेवते.
Latest Marathi News भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आरोग्यासाठी गुणकारी Brought to You By : Bharat Live News Media.