विमानतळ टर्मिनल इमारतीचे लवकरच लोकार्पण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख येत्या आठवड्याभरात जाहीर करू, अशी घोषणा केंद्रीय विमान वाहतूक मंंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. मंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची पाहणी केली. इमारतीच्या कामासंदर्भात अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या. धावपट्टीची लांबी 2300 मीटर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या प्रवेशद्वाराचा लूक हा कोल्हापूरच्या … The post विमानतळ टर्मिनल इमारतीचे लवकरच लोकार्पण appeared first on पुढारी.

विमानतळ टर्मिनल इमारतीचे लवकरच लोकार्पण

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख येत्या आठवड्याभरात जाहीर करू, अशी घोषणा केंद्रीय विमान वाहतूक मंंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. मंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची पाहणी केली. इमारतीच्या कामासंदर्भात अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या. धावपट्टीची लांबी 2300 मीटर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळाच्या प्रवेशद्वाराचा लूक हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरीला साजेसा झाला आहे. त्यामुळे या विमानतळाला एक वेगळे महत्त्व आले असून, येथून अनेक मोठ्या शहरांमध्ये कनेक्टिव्हीटी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील,असे आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी दिले.
कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून 272 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तसेच नव्या टर्मिनल इमारतीचेही काम करण्यात आले. टर्मिनल इमारतीसाठी 72 कोटींचा निधी देण्यात आला होता. या निधीतून इमारतीला नवा ऐतिहासिक लूक देण्यात आला आहे. त्यामुळे ही इमारत आकर्षक अशी दिसू लागली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या इमारतीच्या कामाबद्दल आणि प्रवेशद्वाराविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी आ. अमल महाडिक, समरजित घाटगे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, विमान वाहतूक मंत्रालयाच्या रुबिना अली, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तसेच राजवर्धन निंबाळकर, संग्रामसिंह कुपेकर, महेश जाधव, विजय जाधव, अनिल कामत आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Latest Marathi News विमानतळ टर्मिनल इमारतीचे लवकरच लोकार्पण Brought to You By : Bharat Live News Media.