शिवम दुबे बनणार का हार्दिकचा वारसदार?
मोहाली : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. भारत दौर्यावर आलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. नवीन वर्षातील पहिला टी-20 सामना भारताने जिंकला. शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी सामना एकतर्फी केला. शिवम दुबे याने 40 चेंंडूंत 60 धावा करताना 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. शिवाय, गोलंदाजीत इब्राहिम झद्रानची विकेटही घेतली.
या सामन्यात 40 चेंडूंत 60 धावा करणार्या शिवम दुबेने आपल्या खेळीचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले, तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगसारखी फलंदाजी करणारा शिवम हा मर्यादित षटकांमध्ये हार्दिक पंड्यासारखा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, असे चाहत्यांचे मत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या शिवम दुबेने 60 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय, गोलंदाजी करताना त्याला एक बळी घेण्यात यश आले. त्याने 2 षटके टाकली आणि फक्त 9 धावा दिल्या.
शिवम दुबे डावखुरा फलंदाज असून त्याची हार्ड हिटिंग बॅटिंग त्याला स्पेशल बनवते. याशिवाय तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करतो. असा अष्टपैलू खेळाडू संघात असल्यामुळे संघ भक्कम होतो. हार्दिक पंड्याची दुखापत पाहता शिवम दुबे त्याला पर्याय म्हणून पुढे येतो का हे पाहण्याजोगे असेल.
Latest Marathi News शिवम दुबे बनणार का हार्दिकचा वारसदार? Brought to You By : Bharat Live News Media.