जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकावर शुक्रवारी (दि.१२) महसूल पथकाने कारवाई केली. यावेळी कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने महसूल पथकाने ट्रकसह वाळू जप्त केली.
अवैध वाळू वाहतुकीला आळा बसावा, यासाठी भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी हे पथक गोंभी फाटा येथे ग्रस्त घालत होते. यावेळी मालवाहतुक करणारा ट्रक (क्र एम एच -१९ सी व्हाय ९३६३) तपासला असता वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यावेळी वाहन चालक पंकज विलास सोनवणे याच्याकडे कागदपत्र्यांची चौकशी करण्यात आली. कागदपत्रांमध्ये तफावत आढळ्याने पथकाने वाळूसह ट्रक ताब्यात घेऊन कारवाई केली. ही कारवाई रजनी तायडे मंडळाधिकारी वरणगाव, मिलिंद तायडे तलाठी साकेगाव, नितीन केले तलाठी वराडसीम, जितेश चौधरी कोतवाल साकेगाव, शरद पवार कोतवाल वरणगाव व जयराज भालेराव कोतवाल कठोरे बुद्रुक यांनी केली.
हेही वाचा :
Chinmay Murder Case : .. आणि त्याच निर्विकार चेहऱ्याने सुचनाने दाखिवले प्रात्यक्षिक
छ.संभाजीनगर : गुंठेवारी नसलेल्या घरांवर बुलडोझर चालवणार: मनपा प्रशासकांचा इशारा
Nagar : पेन्डन्सी दिसली तर विभागप्रमुखांवरही कारवाई!
Latest Marathi News जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.
