चिन्मय खून प्रकरण : .. आणि त्याच निर्विकार चेहऱ्याने सुचनाने दाखिवले प्रात्यक्षिक

पणजी : चिन्मय खून प्रकरणाबाबत सुचना सेठला पोलिस शुक्रवारी ( दि.१२) कांदोळी येथील हॉटेलमध्ये घेऊन आले. पोलिसांनी तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा काढला. काहीक्षण ती पोलिसांकडे पाहत राहिली. त्यानंतर ती खोली नं. ४०४ मध्ये गेली. आणि नेहमीच्याच निर्विकार चेहर्‍याने तिने चिन्मयचा मृतदेह बॅगेत कसा भरला, याचे प्रात्यक्षिक दाखविले. मात्र, तिच्या चेहर्‍यावर जराही पश्चातापाचा लवलेश नव्हता, असे पोलिसांच्या … The post चिन्मय खून प्रकरण : .. आणि त्याच निर्विकार चेहऱ्याने सुचनाने दाखिवले प्रात्यक्षिक appeared first on पुढारी.

चिन्मय खून प्रकरण : .. आणि त्याच निर्विकार चेहऱ्याने सुचनाने दाखिवले प्रात्यक्षिक

प्रभाकर धुरी

पणजी : चिन्मय खून प्रकरणाबाबत सुचना सेठला पोलिस शुक्रवारी ( दि.१२) कांदोळी येथील हॉटेलमध्ये घेऊन आले. पोलिसांनी तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा काढला. काहीक्षण ती पोलिसांकडे पाहत राहिली. त्यानंतर ती खोली नं. ४०४ मध्ये गेली. आणि नेहमीच्याच निर्विकार चेहर्‍याने तिने चिन्मयचा मृतदेह बॅगेत कसा भरला, याचे प्रात्यक्षिक दाखविले. मात्र, तिच्या चेहर्‍यावर जराही पश्चातापाचा लवलेश नव्हता, असे पोलिसांच्या बोलण्यातून समजले.
चार वर्षांच्या चिन्मयच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी क्राईम सीन रिक्रिएट करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला सुचना सेठ त्यासाठी तयार नव्हती. पोलिसांच्या मनधरणीनंतर अखेर तीन दिवसांनी घटनाक्रम दाखवण्यासाठी सूचना शुक्रवारी (दि.१२) कांदोळी येथील त्या हॉटेलमध्ये जाण्यास तयार झाली. दुपारी तीन वाजता पोलिस तिला घेऊन त्या हॉटेलवर जाणार होते. मात्र, तिने सुरवातीपासूनच त्यासाठी नकार दिला होता. संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी कळंगुट पोलिसांनी तिला हॉटेलवर नेण्यासाठी पोलिस स्टेशनबाहेर काढले. तेथून ते त्या हॉटेलवर पोचले. सुमारे दीड तास सूचना आणि पोलिस हॉटेलमध्ये होते. या काळात पोलिसांनी शनिवारी ६ जानेवारीपासून रविवारी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जे काही घडले, त्याची माहिती तिच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच चिन्मयचा नेमका कसा खून केला त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाचा मृतदेह कसा बॅगेत भरला त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. मात्र,  तिच्याकडून मिळालेल्या माहितीबाबत पोलिस साशंक आहेत. गेले तीन दिवस पोलिस तिला रिट्रायलसाठी तयार करत होते. अखेर ती आज तयार झाली. साक्षीदारांसमोर रिट्रायल घेण्यात आली.
मुलाचा खून मी केलेला नाही
माझ्या मुलाचा मी खून केलेला नाही. मी झोपण्यापूर्वी तो जिवंत होता. झोपेतून उठले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता, या म्हणण्यावर ती ठाम आहे. माझ्या हाताला काच लागल्याने जखम झाल्याचे ती एकदा सांगते, तर एकदा आपण आपला हात कापून घेतला, असेही सांगते. त्यामुळे पोलिस संभ्रमात आहेत. तिच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या संपते आहे. त्यामुळे ती वाढवून घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : 

चिन्मय खून प्रकरण : शांत, निर्विकार ‘सूचना’ आणि ते 16 तास
रत्नागिरी : मुलीला मेसेज केल्‍याप्रकरणी तरूणाची हत्‍या करण्या-या पाच आराेपींना ६ महिन्याचा कारावास
नांदेड : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News चिन्मय खून प्रकरण : .. आणि त्याच निर्विकार चेहऱ्याने सुचनाने दाखिवले प्रात्यक्षिक Brought to You By : Bharat Live News Media.