बीड : मांजरसुंबा येथे ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चार ठार

बीड; Bharat Live News Media वृत्तसेवा : बीडमधील मांजरसुंबा नजीक अहमदपूर -अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक व पिकअपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप अशी पिकअपमधील मृतांची नावे आहेत. प्रल्हाद घरत आणि नितीन घरत या बाप – लेकांचा मृतांत समावेश असून मृत कंटेनर चालकाचे नाव अद्याप कळाले नाही. अपघातामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर मृतदेह शेवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा :
ठाणे : मुंब्र्यात स्लॅब कोसळून ४ जण जखमी
मंदिर फोडणारे सराईत गुन्हेगार गजाआड दानपेटीसह ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू
Latest Marathi News बीड : मांजरसुंबा येथे ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चार ठार Brought to You By : Bharat Live News Media.
