विशाखा विश्वनाथ, तन्वी बांबोळकार यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार आज (दि.१२) विशाखा विश्वनाथ यांना प्रदान करण्यात आला. तर कोंकणी भाषेसाठी हा पुरस्कार तन्वी बांबोळकार यांना प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार आहे. ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या कवितासंग्रहासाठी कवयित्री विशाखा विश्वनाथ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार कार्यक्रम कोलकाता येथे शुक्रवारी (दि.१२) पार पडला. यावेळी प्रसिद्ध भारतीय बंगाली कवी, संपादक सुबोध सरकार, अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमीच्या वर्ष २०२३ च्या युवा साहित्य पुरस्कारासाठी मराठीसह अन्य २० प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती. या पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि ५० हजार रूपये रोख असे आहे. ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ हा विशाखा विश्वनाथ यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. यामध्ये कवयित्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे.
युवा’ साहित्य अकादमीच्या इतर भाषांमधील पुरस्कार विजेत्या
जिंटु गीतार्थ (आसामी), हमीरद्दीन मिद्या (बाड्:ला), माइनावस्त्रित दैमारि (बोडो), धीरज बिस्मिल (डोगरी), अनिरुध्द कानिसेट्टी (इंग्रजी), सागर शाह (गुजराती), अतुल कुमार राय (हिंदी), मंजुनायक चळ्ळूरु (कन्नड), निगहत नसरीन (कश्मीरी), गणेश पुथुर (मल्याळम), नैना अधिकारी (नेपाळी), संदीप (पंजाबी), देवीलाल महिया (राजस्थानी), बापी टुडू (संताली), मोनिका पजंवानी (सिंधी), राम थंगम (तमिळ), जॉनी तक्केदासिया (तेलुगु) आणि जहन जाद (उर्दू) यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
क्यूआर कोड प्रकरणी काँग्रेस उगारणार कारवाईचा बडगा?
AAP Rajya Sabha : आपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध
मोदी सरकारने दिलेली गॅरंटी महाराष्ट्र सरकारने पुढे नेली : पीएम मोदी
Latest Marathi News विशाखा विश्वनाथ, तन्वी बांबोळकार यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार Brought to You By : Bharat Live News Media.
