मुख्यमंत्र्यांकडून बांबू शेतीचे कौतुक

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई येथे झालेल्ल्या पर्यावरण विकास परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या बांबू शेतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. नगर जिल्ह्यात बांबू शेती वाढीसाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पर्यावरण संरक्षण रक्षणासाठी मुंबई येथे शाश्वत पर्यावरण विकास परिषद घेण्यात आली. परिषदेसाठी नगर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत … The post मुख्यमंत्र्यांकडून बांबू शेतीचे कौतुक appeared first on पुढारी.

मुख्यमंत्र्यांकडून बांबू शेतीचे कौतुक

पारनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  मुंबई येथे झालेल्ल्या पर्यावरण विकास परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या बांबू शेतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. नगर जिल्ह्यात बांबू शेती वाढीसाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पर्यावरण संरक्षण रक्षणासाठी मुंबई येथे शाश्वत पर्यावरण विकास परिषद घेण्यात आली. परिषदेसाठी नगर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व राजेंद्र नन्वरे यांना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, आमदार पाशा पाटील यांच्याकडून विशेष आमंत्रित देण्यात आले होते. परिषदेत बांबू शेतीची लागवड, जोपासना, संगोपन, वाढते तापमानवाढ या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.
यावेळी गायकवाड यांनी वाळुंजच्या गायकवाड फार्मवरील 40 एकर 25 वर्षे जुनी बाबू शेती लागवडीचे छायाचित्र मुख्यमत्री शिदे यांना दाखविले. या बाबूशेतीने मुख्यमंत्री शिंदे प्रभवित झाले. जुने स्नेही सबाजीराव गायकवाड यांच्या प्रकृतीची शिंदे यांनी विचारपूस केली.
परिषदेत उद्योग क्षेत्रातील नादिर गोदरेज, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा, आंतराराष्ट्रीय सौरऊर्जा महासंचालक डॉ.अजय माथूर, केंद्रीय बांबू अभियान संचालक प्रभात कुमार, केंद्रीय वन शास्त्राज्ञ डॉ. अजय ठाकूर, महासंचालक अली मुच्युमो आदींनी मार्गदर्शन केले. नगर जिल्ह्यात बांबू शेती वाढीसाठी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना प्रशिक्षण व प्रोत्साहित करण्यावर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यावेळी बोलताना केली.
Latest Marathi News मुख्यमंत्र्यांकडून बांबू शेतीचे कौतुक Brought to You By : Bharat Live News Media.