आपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यातील तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडुन आले. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह हे पुन्हा एकदा राज्यसभेवर गेले आहेत. तर त्यांच्यासोबत दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि आपचे नेते नारायण दास गुप्ता हेही राज्यसभेवर अविरोध निवडुन आले. … The post आपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध appeared first on पुढारी.

आपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यातील तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडुन आले. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह हे पुन्हा एकदा राज्यसभेवर गेले आहेत. तर त्यांच्यासोबत दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि आपचे नेते नारायण दास गुप्ता हेही राज्यसभेवर अविरोध निवडुन आले. स्वाती मालीवाल आपच्या पहिल्या महिला खासदार झाल्या आहेत.
दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी १९ जानेवारीला निवडणूक होणार होती. मात्र अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे आपच्या तिन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या. आपकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारे तिन्ही उमेदवारांची निवड निश्चीत मानली जात होती. दरम्यान, दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना तुरुंगातून निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती.
स्वाती मालीवाल आपच्या पहिल्या महिला खासदार
स्वाती मालीवाल यांनी २०१५ मध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या महिलांच्या हक्कासह महिलांच्या आणि सामाजिक प्रश्नांसाठी लढणाऱ्या वकील म्हणून परिचित आहेत. विविध चळवळींशी त्या जोडल्या गेल्या आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनातही त्या सक्रिय होत्या. आपमध्ये आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. आता त्या आपच्या पहिल्या महिला खासदार असणार आहेत.
Latest Marathi News आपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध Brought to You By : Bharat Live News Media.