निवेदिता माझी ताई : बहीण-भावाच्या नात्याची उलगडणार अनोखी गोष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका अशा नात्याची गोष्ट जी घराघरांत घडते, एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं, असं एक निरपेक्ष नातं जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं. ते नातं म्हणजे, बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. आजवर अनेक मालिका बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित पडद्यावर आली असेल. हाच मुद्दा पुन्हा एकादा पडद्यावर … The post निवेदिता माझी ताई : बहीण-भावाच्या नात्याची उलगडणार अनोखी गोष्ट appeared first on पुढारी.

निवेदिता माझी ताई : बहीण-भावाच्या नात्याची उलगडणार अनोखी गोष्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एका अशा नात्याची गोष्ट जी घराघरांत घडते, एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं, असं एक निरपेक्ष नातं जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं. ते नातं म्हणजे, बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. आजवर अनेक मालिका बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित पडद्यावर आली असेल. हाच मुद्दा पुन्हा एकादा पडद्यावर चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. सोनी मराठीवर प्रथमच ‘निवेदिता, माझी ताई!’ ही सुंदर मलिका वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे, १५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ… या कवितेच्या ओळी आठवल्या की मनात आपल्या बालपणीच्या आठवणी हमखास दाटून येतात. रिमोटवरून भांडणारी.. एकमेकांची गुपिते आई-बाबांपासून कधी लपवणारी तर कधी त्याच गुपितांच्या जोरावर ब्लॅकमेल करणारी.. एकमेकांना छळणं हा आपला जन्मसिद्ध हक्क मानणारी अशी भावंडं प्रत्येकाच्या हृदयातला एक मोठा कप्पा व्यापतात. कितीही भांडली तरीही बहीण-भावाचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असंच काहीसं असतं.
मात्र, दशमी क्रिएशन्स प्रस्तुत ‘निवेदिता, माझी ताई!’ ही मालिका थोडी वेगळी आहे. बहीण-भावाच्या नात्याची ही गंमत लवकरच उलगडणार असून तत्पूर्वी मालिकेचे मजेशीर प्रोमोज सध्या सोनी मराठीवर पाहायला मिळत आहेत. त्यांना प्रेक्षकांच्या पसंती मिळत आहे.
‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत एतशा संझगिरी आणि तिच्या लहान भावाच्या भूमिकेत रुद्रांश चोंडेकर यांची अप्रतिम केमिस्ट्री पहायला मिळमार आहे. शेअर झालेल्या प्रोमोजला रसिक प्रेक्षकांनी सोशल मिडियावर खूपसाऱ्या लाईक्स आणि व्ह्यूज मिळाल्या आहेत.

बहिणीला सतत चिडवणारे-सतावणारे भाऊ हे चित्र सर्रास प्रत्येक घरात पाहायला मिळतं, पण बहिणीच्या लग्नात, आता बहीण आपल्यापासून दुरावणार या कल्पनेने हेच भाऊ लहान मुलांसारखे रडताना दिसतात. भावा-बहिणीच्या विश्वात एखाद्याच्या येण्याने खरंच बदल घडतो का..? ‘निवेदिता, माझी ताई!’ मालिकेमध्ये अशोक फळदेसाई एका डॅशिंग तरुणाच्या भूमिकेत म्हणजे, यशोधनच्या भूमिकेत दिसणार आहे. यशोधन आणि निवेदिता यांची मॅजिकल लव्हस्टोरी ही या मालिकेचा टर्निंग पॉइंट असणार आहे.
निवेदिता, असीम आणि यशोधन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट ‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोधनची स्वप्नपरी या दोघांच्या निर्व्याज प्रेमात निवेदिताला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवू पाहणारा असीम आणि निवेदितासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारा यशोधन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यामुळे या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
Latest Marathi News निवेदिता माझी ताई : बहीण-भावाच्या नात्याची उलगडणार अनोखी गोष्ट Brought to You By : Bharat Live News Media.