पंचायत निवडणुकीत दिव्यांग महिलांना राखीवता : मुख्यमंत्री सावंत

पणजी; पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीच्या संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील समाजाच्या विकासासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्य सरकार पंचायत निवडणुकांमध्ये दिव्यांग महिलांना राखीव जागा ठेवून त्यांच्या राजकीय विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी आज (दि.१२) केले. पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय … The post पंचायत निवडणुकीत दिव्यांग महिलांना राखीवता : मुख्यमंत्री सावंत appeared first on पुढारी.

पंचायत निवडणुकीत दिव्यांग महिलांना राखीवता : मुख्यमंत्री सावंत

पणजी; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकशाहीच्या संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील समाजाच्या विकासासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्य सरकार पंचायत निवडणुकांमध्ये दिव्यांग महिलांना राखीव जागा ठेवून त्यांच्या राजकीय विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी आज (दि.१२) केले. पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवांतर्गत कला अकादमीतील कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आदी उपस्थित होते.
गोवा सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेला दिव्यांग पर्पल महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. म्हणून यंदा आंतरराष्ट्रीय दिव्यांग पर्पल महोत्सव आयोजित केला आहे. ८ ते १३ जानेवारी पर्यंत चालणार्‍या या महोत्सवात दिव्यांगांच्या हिताच्या अनेक गोष्टी होतील. दिव्यांगांना त्यांचे कौशल्य दर्शवण्याची संधी मिळणार आहे. दिव्यांगाच्या जीवनामध्ये आनंद पसरण्याचे काम हा महोत्सव करत असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री दिव्यांगासोबत रमले. त्यांची विचारपूस केली. त्यांच्या पालकांशी संवाद साधला. दिव्यांगासाठीची सायकल चालवून पाहिली. यंदाच्या महोत्सवात १३ देशांनी सहभाग घेतला आहे. दिव्यांगाच्या कौशल्याचा विकास करण्याचे लक्ष पंतप्रधानांनी ठेवले आहे. त्यानुसारच दिव्यांगांसाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दिव्यांगांना सुखकर होणार्‍या अनेक संकल्पाना दिव्यांगांनीच तयार केल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
कार्यशाळेत एक हजार मुलांचा सहभाग
पर्पल फेस्ट २०२४ मधील या कलादालनात सिद्धांत शाह लोकांचे खुल्या मनाने स्वागत करतात. त्यांची सर्वसमावेशक कला कार्यशाळा, सर्व मर्यादांना झटकून टाकणारी नॉनसेन्स मुव्हमेंट थेरपी आणि संवेदना चेतवणारी संवेदी कला या जोरावर अभिव्यक्तीसाठी एक वैविध्यपूर्ण मंच उपलब्ध करून देते. या कार्यशाळेत एका दिवसात ३०० हून अधिक जण सहभागी झाले आहेत. गेल्या चार दिवसांत १००० हून अधिक मुलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
हेही वाचा :

लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार : सीएम एकनाथ शिंदे
भाजप मोठा पक्ष पण भंडारा माझा गृहजिल्हा! : प्रफुल्ल पटेल
नागपूर : ‘परीक्षांवर बहिष्कार’साठी श‍िक्षण मंडळाला महामंडळाचे पत्र

Latest Marathi News पंचायत निवडणुकीत दिव्यांग महिलांना राखीवता : मुख्यमंत्री सावंत Brought to You By : Bharat Live News Media.