बेपत्ता IAF An-32 विमानाचे अवशेष ८ वर्षानंतर सापडले, गुढ उकलणार

Bharat Live News Media ऑनलाईन : २०१६ मध्ये बंगालच्या उपसागरावर बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या An-32 विमानाचे अवशेष चेन्नईच्या किनाऱ्यापासून ३१० किमीवर सापडले आहेत. बंगालच्या उपसागरात कोसळलेल्या या विमानात २९ लोक होते. शुक्रवारी सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, चेन्नई किनाऱ्यापासून अंदाजे ३१० किमी अंतरावर समुद्राच्या तळात विमानाचे अवशेष सापडले असून त्याच्या प्रतिमा टिपण्यात आल्या आहे. “या प्रतिमांची छाननी करण्यात आली आणि त्या दुर्घटनाग्रस्त An-32 विमानाशी सुसंगत असल्याच्या आढळून आल्या आहेत. याच संभाव्य अपघातस्थळी अन्य कोणतेही विमान कोसळल्याची नोंद नाही. यामुळे हे २०१६ मधील अपघातग्रस्त IAF An-32 (K-2743) विमानाचे अवशेष असल्याचे दर्शविते,” असे निवेदनात म्हटले आहे.
२२ जुलै २०१६ रोजी सकाळी चेन्नईच्या तांबरम एअर फोर्स स्टेशनवरून IAF अँटोनोव्ह An-32 ने उड्डाण केले होते. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील पोर्ट ब्लेअरकडे निघालेल्या या परिवहन विमानात क्रू सदस्यांसह २९ लोक होते. चेन्नईहून सकाळी ८ वाजता उड्डाण केलेल्या या विमानाला पोर्ट ब्लेअरमधील भारतीय नौदलाचे हवाई स्टेशन आयएनएस उत्क्रोश (INS Utkrosh) येथे उतरायचे होते.
उड्डाणानंतर थोड्याच वेळात या विमानाचा संपर्क तुटला आणि बंगालच्या उपसागरावर असताना ते रडारवरून बेपत्ता झाले. सशस्त्र दलांनी समुद्रात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली होती.
१५ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय हवाई दलाने अखेर शोधकार्य थांबवले An-32 K2743 मधील २९ लोकांच्या कुटुंबीयांना पत्र लिहून हवाई दलाने सांगितले की ते बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात अयशस्वी ठरले आणि विमानातील लोकांना मृत घोषित करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
The debris of the Indian Air Force An-32 aircraft (registration K-2743) that went missing over the Bay of Bengal in 2016 has been found approximately 140 nautical miles (approx. 310 Km) from the Chennai coast.
National Institute of Ocean Technology which functions under the… pic.twitter.com/XyEWQcs1zn
— ANI (@ANI) January 12, 2024
हे ही वाचा :
‘डीआरडीओ’ची मोठी कामगिरी : आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
‘चीन सीमेवरील स्थिती संवेदनशील’
‘आदित्य एल-१’कडून आता डेटाची प्रतीक्षा : इस्रो अध्यक्षांची माहिती
Latest Marathi News बेपत्ता IAF An-32 विमानाचे अवशेष ८ वर्षानंतर सापडले, गुढ उकलणार Brought to You By : Bharat Live News Media.
