Nagar : ‘रास्ता रोको’नंतर काही तासांत तोडगा

नगर/वाळकी : Bharat Live News Media वृत्तसेवा : देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकार्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. 12) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. पालकमंत्री विखे महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जात होते. त्या वेळी सकाळी देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. नगर-मनमाड महामार्गावरच हे आंदोलन करत विद्यार्थ्यांनी अनेक एसटी बस सुमारे तासभर अडवून ठेवल्या होत्या. विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून थेट विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
त्यांचा प्रश्न समजावून घेतला. देहरे येथून नगर शहरात विविध महाविद्यालयांत जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांसाठी नगर-देहरे ही बस पूर्वी सुरू होती. मात्र अनेक दिवसांपासून ती बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगावकडून येणार्या बसची प्रतीक्षा करावी लागते. या बसमध्येही पासधारक विद्यार्थ्यांना घेत नाहीत.अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. विकास जाधव, तौफिक शेख, घनश्याम पिंपळे, सौरभ कुसळकर, सार्थक बंगे, रेहान शेख, आरजू खान, आफ्रीन शेख, युक्ता काळे, अमृता जेजूरकर यांच्यासह 70 ते 80 विद्यार्थी आंदोलात सहभागी झाले होते. ग्रामपंचायत सदस्य किरण लांडगे, विकास जाधव, रवींद्र लांडगे, श्रीकांत लांडगे, महेश काळे, अजित काळे, मेघनाथ धनवटे, निखील कपाले, संदीप लांडगे, प्रणाम काळे, वैभव काळे, पोलिस पाटील चंद्रकांत यांच्यासह ग्रामस्थही आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या समस्येचे गांभार्य लक्षात घेऊन विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना नगरमध्ये सुरू असलेल्या युतीच्या मेळाव्याच्या ठिकाणी भेटण्यास बोलावले आणि हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी लगेच आंदोलन मागे घेतले आणि निवडक विद्यार्थी नगरला आले.
आजपासून थांबणार सात एसटी बस
युतीचा मेळावा सुरू असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विखे पाटील यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. विखे पाटील यांनी एसटी महामंडळाच्या अधिकार्यांना तेथे बोलावून विद्यार्थ्यांशी चर्चा घडवून आणली. विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणार्या बसपैकी सात बस उद्यापासून (दि. 12) देहरे येथे थाबतील, असा निर्णय महामंडळाच्या अधिकार्यांनी जाहीर केला. दरम्यान, याबाबत काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा, असे पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सकाळी आंदोलन करत केलेली मागणी काही तासांत पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
Latest Marathi News Nagar : ‘रास्ता रोको’नंतर काही तासांत तोडगा Brought to You By : Bharat Live News Media.
