नगर जिल्ह्यात 195 शाळा एकशिक्षकी !

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांची नवीन भरती नाही, त्यातच वयोमानाप्रमाणे होणारी निवृत्ती, पदोन्नतीमुळे रिक्त झालेली शिक्षक पदे, या कारणांमुळे बहुसंख्य द्विशिक्षकी शाळा आता एकशिक्षकी झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 195 शाळांमध्ये आजमितीला केवळ एकेक शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती पालकांमधून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 3500 पेक्षा अधिक शाळा आहेत. या ठिकाणी … The post नगर जिल्ह्यात 195 शाळा एकशिक्षकी ! appeared first on पुढारी.

नगर जिल्ह्यात 195 शाळा एकशिक्षकी !

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिक्षकांची नवीन भरती नाही, त्यातच वयोमानाप्रमाणे होणारी निवृत्ती, पदोन्नतीमुळे रिक्त झालेली शिक्षक पदे, या कारणांमुळे बहुसंख्य द्विशिक्षकी शाळा आता एकशिक्षकी झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 195 शाळांमध्ये आजमितीला केवळ एकेक शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती पालकांमधून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 3500 पेक्षा अधिक शाळा आहेत. या ठिकाणी सुमारे 11 हजार शिक्षक कार्यरत आहेत. मात्र गेल्या वर्षी 2023 मध्ये अनेक पदोन्नती झाल्या आहेत. त्यामुळे रिक्त पदे झाली आहेत. यात मुख्याध्यापकांच्या 65 जागा रिक्त झाल्या आहेत, त्या ठिकाणी ज्येष्ठ शिक्षकावर ही जबाबदारी दिलेली आहे. याशिवाय पदवीधर शिक्षक पदोन्नतीने रिक्त जागाही झाल्या आहेत. त्यात दोन शिक्षकी शाळांवरीलही काही शिक्षक पदोन्नतीने गेल्याने आता 195 शाळा एकशिक्षकी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्या एका शिक्षकाची कसरत सुरू आहे. शिक्षकाने सुटी घेतल्यास शाळाच बंद राहण्याची शक्यता आहे. त्या शिक्षकांच्या सुट्याही बंद आहेत.
समायोजनाचा पर्याय?
दैनंदिन कामकाज, चार वर्गांचे अध्यापन, प्रशासकीय कामे, सभा, मुख्याध्यापक पदाच्या जबाबदार्‍या यामुळे एकशिक्षकी शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे 2023-24 मधील पटानुसार अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करून विद्यार्थ्यांचे नुकसान टळू शकते, असाही पालकांचा सूर आहे.
एकशिक्षकी शाळा :
अकोले ः 22, जामखेड ः 13, कर्जत ः 19, कोपरगाव ः 18, नगर ः 9, नेवासा ः 15, पारनेर ः 25, पाथर्डीः 9, राहाता ः 10, राहुरी ः13, संगमनेर ः9, शेवगाव ः 11, श्रीगोंदा ः 21, श्रीरामपूर ः 1.
पदावनती करून नेमणुका द्या : वांढेकर
प्रशिक्षित पदवीधर पदावर काम करणार्‍या तसेच बारावी विज्ञान विषयातून तात्पुरती विज्ञान पदवीधर पदोन्नती स्वीकारलेल्या आणि पदावनतीचे प्रस्ताव दाखल असलेल्या शिक्षकांची पदावनती करून त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक द्यावी, जेणेकरून रिक्त जागांचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागेल, असे पत्र अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर यांनी शिक्षण विभागाला दिले आहे.
आंतरजिल्हा बदलीतील शिक्षक लटकले!
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांमुळे एकशिक्षकी शाळांना दुसरे शिक्षकही मिळणार होते. मात्र आता शासनाच्या एका पत्रानुसार, शिक्षकभरती होईपर्यंत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्त्या देऊ नये, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून आलेले 160 आणि जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या 42 शिक्षकांच्या नियुक्त्या रखडणार आहेत.
Latest Marathi News नगर जिल्ह्यात 195 शाळा एकशिक्षकी ! Brought to You By : Bharat Live News Media.