पत्नीसह तिघांना चाकूने भोसकले ! पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी थरार

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील वर्दळीच्या नांदेड सिटी येथील डिस्टिंक्शन सेंटरमधील परफेक्ट युनिक्स सलुन दुकानात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास चित्रपटासारखे अंगावर शहारे आणणारे थरार नाट्य नागरिकांनी अनुभवले. एका बेधुंद पतीने हातात धारदार चाकूने पत्नीला, तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना चाकूने भोसकले. त्यात तिघांसह हल्लेखोर पतीही झटापटीत गंभीर जखमी झाला. चाकू हल्ल्यात सफाई कामगार … The post पत्नीसह तिघांना चाकूने भोसकले ! पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी थरार appeared first on पुढारी.

पत्नीसह तिघांना चाकूने भोसकले ! पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी थरार

खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील वर्दळीच्या नांदेड सिटी येथील डिस्टिंक्शन सेंटरमधील परफेक्ट युनिक्स सलुन दुकानात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास चित्रपटासारखे अंगावर शहारे आणणारे थरार नाट्य नागरिकांनी अनुभवले. एका बेधुंद पतीने हातात धारदार चाकूने पत्नीला, तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना चाकूने भोसकले. त्यात तिघांसह हल्लेखोर पतीही झटापटीत गंभीर जखमी झाला. चाकू हल्ल्यात सफाई कामगार महिला आरती वाल्मिकी (वय 23 , सध्या रा. नांदेड सिटी, मूळ रा. बिहार) तसेच सलुन कामगार गणेश रामजी राठोड (वय 32, रा. नांदेड सिटी) व सार्थक वसंत चरेकर (वय 22, सध्या रा. नांदेड सिटी, मूळ रा. पानशेत, ता. वेल्हे) जखमी झाले आहेत. हल्लेखोर पती खुदेय कैलास वाल्मिकी (वय 32 , सध्या रा. नांदेड सिटी, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे तपास करीत आहेत.
आरती वाल्मिकी या सलून दुकानात सफाईचे काम करत होत्या. तिचे बुधवारी (दि. 10) रात्री तिच्या पतीबरोबर भांडण झाले. नेहमीप्रमाणे आरती गुरुवारी सकाळी सलून दुकानात सफाईसाठी आल्या होत्या. तिच्या पाठोपाठ तिचा पती खुदेय हा दुकानात आला. त्याने हातातील चाकूने आरतीवर वार केले. त्यावेळी तेथील कामगार सार्थक चरेकर व गणेश राठोड आरतीच्या मदतीसाठी पुढे आले. त्यावेळी खुदेय याने या दोघांवरही वार केले. या झटापटीत खुदेय हा खाली पडला. त्यात तोही गंभीर जखमी झाला. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, हवेलीचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलिस हवालदार किरण बरकाले, पोलिस नाईक अशोक तारू, राजेंद्रे मुंढे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. हवेली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वीस मिनिटे थरार नाट्य
नांदेड सिटी येथील सलुनच्या दुकानात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे हे थरारनाट्य सुरू होते. त्यामुळे नेहमी शांत असलेल्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सलून दुकान मालक मोतीलाल राठोड म्हणाले, ’पत्नी व कामगारांवर चाकूने हल्ला करून खुदेय याने स्वतःवर वार केले त्यात तो जखमी झाला.’  या हल्ल्याची दिवसभर परिसरात चर्चा सुरू होती.
Latest Marathi News पत्नीसह तिघांना चाकूने भोसकले ! पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी थरार Brought to You By : Bharat Live News Media.