ठाणे : खडी यंत्रामध्ये पडून कामगाराचा मृत्यू

ठाणे : Bharat Live News Media ववृत्तासेवा : खडी यंत्रामध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी नागलबंदर परिसरात घडली आहे. भलबद्र यादव (वय ४०) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. हे काम करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची साधने नसल्याने संबंधित मालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.
मृत भलबद्र यादव हे गुरुवारी सायंकाळी खडीपासून पावडर बनवण्याचे काम करत असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खडी यंत्रात पडले. यादव या यंत्रात पडल्याचे लक्षात आल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला खासगी आणि त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, शासकीय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. भलबद्र हे त्यांची पत्नी, तीन मुली आणि एका मुलासोबत नागलबंदर परिसरातच राहत होते.
हेही वाचा
ठाणे : पतीने केली पत्नीसह दोघा चिमुकल्यांचा खून; ठाण्यातील कासारवडवली येथील घटना
Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला
ठाणे : प्रेयसीला कारने चिरडण्याचा प्रयत्न, ‘एसआयटी’ चाैकशी हाेणार
Latest Marathi News ठाणे : खडी यंत्रामध्ये पडून कामगाराचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
