नागपूर : ‘परीक्षांवर बहिष्कार’साठी शिक्षण मंडळाला महामंडळाचे पत्र

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी 10 वी, 12 वीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधुरी सावरकर यांना देण्यात आले.
प्रलंबित मागण्यांमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा रिक्त जागा असून 2012 पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेत्तर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने शाळांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. आदी प्रश्न त्वरित मार्गी लावावे, अन्यथा 10 वी, 12 वीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्यात येईल, असे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे नागपूर विभाग अध्यक्ष प्रा. अनिल शिंदे, कार्यवाह किशोर मासुरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य अतुल घुडगे, आल्हाद भांडारकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा
नागपूर : प्रफुल्ल पटेल म्हणतात भाजप मोठा पक्ष, पण भंडारा माझा गृहजिल्हा !
हेमा मालिनी, कैलास खेरसह दिग्गज कलावंत नागपूरमधील रामटेकच्या महोत्सवात
नागपूर : महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला, विद्यार्थी आक्रमक
Latest Marathi News नागपूर : ‘परीक्षांवर बहिष्कार’साठी शिक्षण मंडळाला महामंडळाचे पत्र Brought to You By : Bharat Live News Media.
